पान:E-Book 100 Common Birds in Maharashtra Marathi (2).pdf/59

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्रातील १०० सामान्य पक्षी
डॉ. राजू कसंबे : 2015


लाल पंखी होला
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नाव: लाल पंखी होला.

इंग्रजी सामान्य नाव: Red Collared Dove. शास्त्रीय नाव: Streptopela tranquebarica. लांबी: २३ सेंमी. आकार: मैंनेएवढा. ओळख: नराचे डोके निळसर-करडे, वरील बाजू गुलाबी-लालसर व खालील बाजू गुलाबी असते. मानेवर अर्धवट काळी गळपट्टी. मादीची वरील बाजू गडद उदी-तपकिरी, खालील बाजू गडद पिवळसर-करडी असून बुड पांढरे

असते. आकाराने लहान व आखूड शेपूट. आवाज: कर्कश वारंवार केलेला ‘ग्रु-गुरर-गु'. व्याप्ती: रहिवासी, संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: विरळ झाडीचे प्रदेश, माळरान. खाद्यः जमिनीवर वेचलेले धान्य व बिया.

५९