पान:E-Book 100 Common Birds in Maharashtra Marathi (2).pdf/5

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्रातील १०० सामान्य पक्षी
डॉ. राजू कसंबे : 2015


ऋणनिर्देश

प्रस्तुत ई-पुस्तक काढण्यामागे माझी विकिपीडिया आणि विकीपेडिया कॉमन्स मध्ये मी काढलेली छायाचित्रे अपलोड करण्याची सवय कारणीभूत आहे. अनेक नामवंत निसर्ग अभ्यासक व छायाचित्रकार स्वतःची उत्तमोत्तम छायाचित्रे ह्या संकेतस्थळावर उपलोड करीत असतात. कुठल्याही आर्थिक मोबदल्याची अपेक्षा न करता !

इंटरनेटवर आज लक्षावधी पुस्तके तयार होतील एवढी माहिती मोफत उपलब्ध आहे. पण त्यातून नेमकेपणाने आपल्या उपयोगाचे तेवढे वेचता येणे फार महत्त्वाचे असते.

मराठी भाषिक पक्षिमित्र तसेच निसर्गप्रेमीसाठी अशीच पक्ष्यांसबंधीची माहिती पस्तकरूपाने उपलब्ध करावी अशी प्रेरणा मिळाली.

खालील पक्षीमित्रांनी त्यांनी काढलेली पक्ष्यांची उत्तम छायाचित्रे उपलब्ध करून दिली.

डॉ. तारिक़ सानी, वेदांत कसबे, हरिश्चंद्र म्हात्रे, नंदकिशोर दुधे, गोपाळराव ठोसर, डॉ. गजानन वाघ, लतीश डेकाटे, अनिल महाजन (जळगाव), अल्केश ठाकरे, जे. एम. गर्ग, अक्षय चारेगावकर त्यांच्या मदतीमुळे आणि निस्वार्थं प्रेमामुळेच हे छोटेसे पुस्तक पूर्णत्वास जाऊ शकले. त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार !

माझे पक्षीवेड़ जोपासण्यात माझी पत्नी सौ. उज्ज्वला व अपत्ये क. प्रांजली व चि. वेदांत ह्यांचा फार मोठा वाटा आहे.

डॉ. राजू कसंबे