पान:E-Book 100 Common Birds in Maharashtra Marathi (2).pdf/49

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्रातील १०० सामान्य पक्षी
डॉ. राजू कसंबे : 2015


जांभळी पाणकोंबडी

E-Book 100 Common Birds in Maharashtra Marathi (2).pdf

(छाया: वेदांत कसंबे)


मराठी नाव: जांभळी पाणकोंबडी.

इंग्रजी नाव: Purple Swamphen (जुने नाव - Purple Moorhen). शास्त्रीय नाव:

Porphyric porphyrio. लांबी: ४३ सेंमी. आकार: कोंबडीपेक्षा मोठा. ओळख: मोठी, एकंदरीत जांभळ्या-निळ्या वर्णाची, लाल पाय, पायाची बोटे खूपच लांबोळकी. चोच लाल आणि जड. चोचीवर लाल मांसल शिरस्त्राण. चालताना शेपटीला झटके देते तेव्हा शेपटीखालचा पांढरा वर्ण नजरेत भरतो. आवाज: 'क्विनक्विनक्रक्र' असा जोरदार तसेच 'चक चक' असा हळुवार आवाज करते. व्याप्ती: रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: पानथळीच्या काठावरची वनस्पती (रामबाण इ.). मोठे दलदलीचे प्रदेश. खाद्य: धान आदी पाणवनस्पतींच्या बिया व कोवळे कोंब, तसेच कीटक व मृदूशरीरी प्राणी.

४९