पान:E-Book 100 Common Birds in Maharashtra Marathi (2).pdf/41

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्रातील १०० सामान्य पक्षी
डॉ. राजू कसंबे : 2015


दलदली हारिण
(छाया: वेदांत कसंबे)

मराठी नाव: दलदली हारिण.

इंग्रजी नाव: Eurasian (Western) Marsh Harrier. शास्त्रीय नाव: Circus

aeruginosus. लांबी: ५६ सेंमी. आकार: घारीपेक्षा छोटा. ओळख: इतर हारीणांपेक्षा आकाराने मोठा. नर- एकंदरीत गडद तपकिरी वर्णाचा; डोके, छाती व मान फिक्कट तांबूस. पंख व शेपटीवर करडी पिसे, पंखांची टोके काळी, मादी- एकंदरीत चॉकलेटी तपकिरी वर्ण: टोपी, घसा व पंखांची समोरील बाजू खांद्याजवळ फिक्कट पिवळसर असते. उडताना ही वैशिष्ट्ये दिसून पडतात. व्याप्तीः स्थलांतरित. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: दलदलीचे प्रदेश. तलाव, खाइया. खाद्यः बेडूक, मासे, छोटे पक्षी, छोटे सस्तन प्राणी तसेच मृत प्राणी.

४१