पान:E-Book 100 Common Birds in Maharashtra Marathi (2).pdf/20

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्रातील १०० सामान्य पक्षी
डॉ. राजू कसंबे : 2015


लहान बगळा
(छाया: डॉ. राजू कसंबे)


मराठी नाव: लहान बगळा.

इंग्रजी नाव: Little Egret. शास्त्रीय नाव: Egretta garzetta. लांबी: ६३ सेंमी. आकार: गावठी कोंबडीएवढा. ओळख: सडपातळ आणि छोटा पांढराशुभ्र बगळा. काळी चोच, काळे पाय व पिवळी बोटे (मोजे घातल्यासारखे). चोच व डोळ्यामधील त्वचा विणीच्या हंगामात लालसर होते, इतर वेळेस ती करडी व पिवळी असते. विणीच्या हंगामात पाय लालसर होतात, पाठीवर तसेच छातीवर सुंदर पिसे धारण करतात. व्याप्ती: रहिवासी. महाराष्ट्रात सर्वत्र. अधिवास: तलाव, नद्या, दलदलीचे प्रदेश, भातखाचरे, खाड्या, खाजनीचे प्रदेश, तिवराची बने.

गोड्या पाण्याजवळ अधिक आढळतो. खाद्य: किटक, मासे, बेडूक, छोटे सरपटणारे प्राणी इ.

२०