Jump to content

पान:Dharmshastra.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अथ
धर्मशास्त्रे स्त्रीधन प्रकरण प्रारंभ:

 स्त्रीधन मणजे स्त्रियांस, आई बाप इत्यादिकांकडून जें द्रव्य मिळते ते. स्त्रीधनाचे स्वरूप व ती किती प्रकारची आहेत ते सांगतो:-

 श्लोक ॥ मनुः ॥ पितृमातृपतिभ्रातृदत्तमध्यग्न्युपागतम् ॥ सुत-‍ दत्तंबंधुदत्तम् ॥ १ ॥
 १ पितृदत्त स्त्रीधन ह्म‌णजे बापापासून जे धन कन्येस मिळते तें.
 २ मातृदत्त स्त्रीधन ह्मणजे आईपासून में धन कन्येस मिळतें तें.
 ३ पतिदत्त स्त्रीधन ह्मणजे बायकोस नवऱ्याकडून जे मिळतें तें.
 ४ भ्रातृदत्त स्त्रीधन म्हणजे भावाकडून जे बहिणीस मिळतें तें.
 ५ सुतदत्त स्त्रीधन म्हणजे मुलाकडून जे धन आईस मिळतें तें.
 ६ बंधुदत्त स्त्रीधन ह्मणजे आपल्या जातवाल्यांकडून जें धन स्त्रियांस मिळते तें धन. याप्रमाणे स्त्रीधने आहेत; त्यांची स्वरूपें स्मृतिकाराने स्पष्ट सांगितली नाहीत. कारण, यांचा अर्थ उघड आहे. बाकी जी स्त्रीधने आहेत, त्यांची स्वरूपें कात्यायनस्मृतिकाराने श्लोकरूपेंकरून उघड पुढे दाखविली आहेत, ती अनु- क्रमाने सांगतो:---

विशेष समजुत.

(१) एखाया मुलीला तिच्या बांपाकडून वारसाच्या नात्याने मिळकत मिळाली असनां, ती तिचे स्त्रीधन आहे. इं. लॉ. रि. मुं. सी. व्हा. ९ पृ. ३०१.
(२) ज्या ठिकाणी मिताक्षराग्रंथ मानितात त्या ठिकाणी, मुलीस वारसाचे नात्याने बापाची मिळकत मिळाली असेल ती तिचे स्त्रीधन आहे. व ती मिळकत तिचे मरणानंतर तिच्या मुलांकडे न जातां मुलीस मिळाली पाहिजे. इं. लॉ. रि. मुं. सी. व्हा. १४ पृ. ६१२.
(१) स्त्रीस नवऱ्याकडून वेळोवेळी जंगम मिळकत बक्षीस मिळाली असेल ती तिचें स्त्रीधन आहे. त्या धनाने तिने स्थावर मिळकत संपादन केली असेल ती मृत्युपत्र करून विल्हेवाट करण्याचा तिला आधिकार आहे. इं. लॉ. रि. म. सी. व्ह.. १ पृ. २८१ .
(२) विधवेस नवऱ्याकडून स्त्रीधन मिळाले असेल त्यांतून स्थावर मिळकत त्या विधवेने विकत घेतली असेल त्या मिळकतीची व्यवस्था मृत्युपत्र करून लावण्याचाही तिला अधिकार आहे. ई. लॉ. रि. म. सी. व्हा. २ पृ. ३११ .
(३) निपुत्रीक विधवेस तिच्या नवऱ्याने स्थावर मिळकत वडिलोपार्जित मिळकतीपैकी बक्षीस दिली होती ती मिळकत तिचे स्त्रीधन होत नाही, करिता ती मिळकत, तिचे वारस अ.भा. तिला दुसऱ्यास बक्षीसपत्रकरून देता येत नाही. इं. लॉ. रि. अ. सी. व्हा. १ पृ. ७३६.
(४) कोणी हिंदूने आपला गांवातील हिस्सा आपले यायकोस केवळ तिच्या फायद्याकरिता दे.