पान:Bhovara-Iravati Karve.pdf/74

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

७४ / भोवरा

पडला होता व नेहमीच्या पद्धतीप्रमाणे इतर बुकांबरोबर तोही त्यांनी घेतला. वरतीच तो अंक होता म्हणून हाती धरला. त्यावर एका वन्य कन्येचे चित्र होते. आजोबांनी न्याहाळून पाहिले, मान डोलवली व म्हटले, सुंदर आहे, सुंदर आहे.
 उत्तम संगीत व नाटक ही त्यांना मनापासून आवडतात. कधी पैसे टाकून गाण्याच्या बैठकीचे किंवा नाटकाचे तिकीट त्यांनी घेतलेले स्मरत नाही. कोणी नेले तर संकोच न करता जातात आणि अगदी शेवटची तान व शेवटचा अंक होईपर्यंत बसून ऐकतात व बघतात.
 त्यांच्या वागण्यातली निर्व्याजता मुलाची आहे. एक प्रकारचा आत्मकेंद्रितपणा आहे; तोही मुलाचा आहे. फरक एवढाच की, मुले रुसतात, रागावतात. हे मूल बहुधा आत्मतुष्ट असते. यंदा विभागासाठी काम करायला मला जीप गाडी मिळाली आहे. ती जेव्हा मोकळी असेल तेव्हा आठ आणे मैल भाडे देऊन डेक्कन कॉलेजातील लोकांना ती वापरता येते. मी ती एक दिवस घरी आणली व आजोबांना खडकवासल्याच्या धरणापर्यंत फिरायला नेऊन आणायला सांगितले. बरोबर गौरीची एक मैत्रीण व माझे एक मित्र बडोद्याचे प्रो. कालेलकर असे होते. गौरीला सांगितले होते की धरणावरून परत या. पण तिला तिच्या आजोबांप्रमाणेच खर्चाची कधी कल्पना नसते, तिने आजोबांना धरण तर दाखवलेच, पण नॅशनल डिफेन्स अंकाडेमी, पुणे युनिव्हर्सिटी, वगैरे चांगले ४० मैल फिरवून आणले. आजोबा चढ चढून, धरण पाहून मोटरीत बसले. युनिव्हर्सिटीत बागवानाकडून फुलांचा मोठा गुच्छ विकत घेऊन नातीबाईने आजोबांना दिला, सगळी मंडळी अगदी खुषीत होती व मोटरीत गात होती. मुली म्हणत होत्या, "Que Sera, Sera, Whatever will be will be" आजोबा म्हणत होते “त्रैगुण्यविषया वेदाः निस्त्रैगुण्यों भवार्जुन..." कोणीच अर्थासाठी गाणी म्हणत नव्हते, आनंद व्यक्त करायचा ती एक तऱ्हा होती, एवढेच. घरी आल्यावर एवढी हवा खाल्यामुळे भूक लागली होती. आजोबा, नातीबाई व पाहुणी हात मारून जेवली व नंतर आजोबा नेहमीप्रमाणे तीन तास बाळझोपेने झोपले. कधी अननस, हापूसचा आंबा किंवा असाच काही सर्वांच्या आवडीचा जिन्नस आणला व सर्वाना बशा भरून ठेवल्या म्हणजे आजोबा मिटक्या मारून खातात. बशी रिकामी झा की निरागसपणे विचारतात, “एवढाच का माझा वाटा?" दिनू नाही तर मी