पान:Bhovara-Iravati Karve.pdf/153

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भोवरा / १५३

राग येतो; वाइंटही वाटते. पण त्याचं काहा चालत नाहा. जो गोष्ट नाग लाेकांची तीच इतर वन्य जमातीची. सर्व वन्य टाळ्यामध्ये वन्य संस्कृतीच्या रक्षणाच्या नावाखाली आसामी लोकाच्याबद्दल दोष पसरवला जात आहे. आसामी विधिमंडळावरती तर सगळ्यांना जागा हव्यातसरकारी नोकऱ्या हव्यात. पण आम्ही आसामी नाही, हा प्रत्येकाचा घोष चालू असतो. मी गेले त्याच सुमाराला आसामचा फुटबॉल संघ बंगालच्या फुटबॉल संघाशी खेळायला जावयाचा होता. ह्या संघात एक लुशाई खेळाडू होता. ह्या खेळाडूने जायच्या आदल्या दिवशी "मी आसामी नव्हे, लुशाई आहे" असे सांगून संघातर्फ खेळण्यास साफ नकार दिला. हा प्रकार घडण्याच्याआधी एक दोन दिवसच दिल्लीतील एक बडे प्रस्थ आसाम व मणिपूरच्या दौच्यावर होते व त्यांनी आपल्या भाषणातून खोर्यातील लोकांना उद्देशून त्यांना ‘टेकड्यांवरील जमातीची पिळवणूक करणारे असे संबोधन वापरले होते. या सर्व गोष्टींचा ऊहापोह त्यादिवशी झाला. चालले आहे हे बरे नाही हे साच्यांनाच दिसत होते. पण सर्वच त्या बाबतीत अगतिक दिसले. मीही या विचित्र समस्येबद्दल अचंबा करीत माझ्या प्रवासी बंगल्यात परतले.
 दुसच्या दिवशी भल्या पहाटे प्रवासाला सुरुवात झाली. गारो टेकड्या बच्याच दूर आहेत. माझ्या मनात शक्य तो दिवसा-उजेडी गारो प्रदेशाचे मुख्य शहर तुडा म्हणून आहे तेथे पोचायचे होते. गारो टेकड्यांच्या प्रदेशात पोचले की तुडाच्या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू होते. दुपारी १२ ते १ वरती जाणाच्या मोटारीसाठी रस्ता खुला होतो. ती वेळ चुकली की ध्याकाळचे सहा वाजेपर्यंत प्रवेश मिळत नाही. दुर्दैवाने त्या गावाच्या अलीकडे २५-३० मैल आमच्या मोटरची टायर फुटली. ती काढून नवी टायर बसबीपर्यंत खूपच वेळ गेला व घाटाच्या पायथ्याशी येईतो एक-दीड वाजून गेला होता. काही इलाज नव्हता, जवळच्या एका प्रवासी बंगल्यात ३-४ तास घालवले व संध्याकाळी सहाला घाट चढायला सुरुवात केली. थोडयाच वेळात अंधार पडला व घाटातून जाताना मला जे सृष्टिसौन्दर्य पाहायचे होते ते पाहता येईना. वाटेने जंगल भेटेल अशी कल्पना होती पण जंगल असे कोठे दिसेना. लहान लहान बांबू असलेल्या टेकड्या, तर काही वर नुसते गवत उगवलेल्या अशा टेकड्या दिसत होत्या. काही वेळाने लांबवर भलामोठा उजेड दिसला. मला वाटले चंद्र उगवला की काय, पण