पान:Bhovara-Iravati Karve.pdf/107

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
    ११
   भ्रमंती

 आंब्याच्या दाट पालवीतल्या गडद छायेत प्रकाशाचा लांबलचक किरण चमकला. परत पाहिले तर तो किरण सजीव होऊन इकडून तिकडे नाचत होता! आता ओळख पटली. एकटाच आहे वाटते. मादी पण आसपास असली पाहिजे. हा उत्तरेकडचा माशा खाणारा पक्षी. इंग्रजांनी त्याला नाव दिले आहे ‘नंदनवनातील मक्षिका-भक्षक'; आणि त्याला कारण काय, तर त्याची ‘मिया मूठभर, दाढी हातभर' असे प्रमाण असलेली फूट दीड फूट लांबीची पांढरी शुभ्र, अरुंद शेपटी, हा लहानसा पक्षी दाट पानांच्या झाडांत डहाळीडहाळीवरून उड्या मारीत कीड व किडे शोधून खात असतो. तो इकडून तिकडे आतल्या आत उडत असला म्हणजे त्याचे चिमुकले शरीर दिसायच्या आधी त्याची शुभ्र रेशमी शेपटी सुरकांड्या मारताना दिसते. हिमालयाच्या खालच्या रांगांपासून तो मध्यओरिसापर्यंत हा रमणीय पक्षी हिवाळ्याखेरीज दिसतो. पुण्यात फक्त अश्विन मार्गशीर्षाच्या दिवसांत दिसतो. इकडे थंडी पडू लागली की आणखी दक्षिणेकडे जातो की काय कोण जाणे! पुण्यात दरवर्षी आमच्या बागेत एखादा आठवडाभर दिसतो न् वर्षभर कुठे गडप होतो कोण जाणे!
 हळूहळू पाय न वाजवता मी जवळ गेले, तो लाल विटकरीच्या रंगाची त्याची मादी पण दिसली. दोघेही अगदी आपल्या कामात दंग होती. नर पांढऱ्या शेपटीमुळे लांबूनसुद्धा दिसतो. मादीला मात्र जरा शोधावे लागते. हिवाळ्यातल्या या पहिल्या पाहुण्यांचे मी स्वागत केले.
 हळूहळू इतरही लांबलांबचे पाहुणे येऊ लागले. संध्याकाळी कालव्यावरून जाताना खुपसे चतुर दिसले. त्यांच्या अभ्रकी पंखांचे कौतुक