पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[८४]

संपति उत्पन्न करतो ती इतक्या मोठ्या प्रमाणावर करतो कीं त्याची स्वतःची गरज किंवा मागणी म्हणजे 'दुर्यामे खसखस' या मासल्याची असते. अर्थात ही सर्व संपनि विकून किंवा तिला गि-हाईक शोधून काढून ती संपति योग्य किंमतीला विकून झाल्यावर व बाकीच्या संपत्तीच्या उत्पादक वर्गीच्या मोबदल्याची भरपाई झाल्यावर जें कांहीं राहील तो त्याचा नफा असतो. म्हणजे मजुराप्रमाणें कारखानदाराचा मोबदला ठरलेला नसतो; त्या मोबदल्यामध्यें धोक्याचा अंश सदोदित आस्तित्वांत असतो. त्यामुळेच कारखानदाराचें काम इतकें कठिण असतें. सर्व कारखाना सुयंत्रित चालवून होतां होईल तितकी काटकसर करून जर तो कारखाना चालवील तर त्याला नफा अगर फायदा मिळेल, नाहीं तर त्याचा कारखाना आंतबट्ट्याचा होईल. म्हणून कारखानदाराचें इतकें महृत्व आहे. कमी कर्तृत्ववान् मनुष्याच्या हातीं जर कारखाना जाईल तर तो संपत्ति वाढविण्याच्या साधनीभूत न होतां संपतिनाशाचें मात्र कारण होईल. समाजाच्या बाल्यावस्थेंत व उद्योगधंदे घरगुती स्थितींत असतांना प्रत्येक उद्यागी मनुष्य कारखानदारच असतो. या स्थितीत मजूर व कारखानदार यांचें पृथकरण झालेलें नसतें. परंतु जसजशी समाजाची अधिभौतिक प्रगति होते तसतसा मजुरापासून कारखानदाराचा वर्ग भिन्न व. स्वतंत्र होतो.
 येथें संपत्तीच्या मूर्त कारणांचा विचार पुरा झाला. या कारणांपैकीं पहिलिं तीन कारणें साधनासारखीं अहित, तर शवटचें साधकासारखें आहे. म्हणजे पहिलीं तीन साधनें एकत्र आणून त्यांचेपासून प्रत्यक्ष संपत्ति उत्पन्न करणें हें साधकाचें काम अहि. परंतु हीं साधनें एकत्र आणण्याच्या निरनिराळ्या तऱ्हा अगर पद्धति आहेत व त्यांवर संपनीच्या वाढीचा कमीअधिकपणा अवलंबून आहे. तेव्हां आतां त्या पद्धतीचें विवेचन करणें ओघोनेंच प्राप्त होतें. तरी त्या विवेचनास पुढील भागांत प्रारंभ करूं.