पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/86

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[७४]

 गडा होण्याकरितां मिल्लच्या भांडवलासंबंधींच्या प्रसिद्ध प्रमेयांचा ऊहापेहा येथें करणें जरूर आहे. या प्रमेयांच्या सत्यत्वाबद्दल अर्थशास्त्रकारांत फारच वादविवाद माजलेला आहे व आपलीं प्रमेयें वादग्रस्त आहेत हें जाणूनच मिल्लनें आपल्या प्रमेयांचें समर्थन पुष्कळ अंगांनिं निरनिराळ्या विचारसरणीनें, पुष्कळ दाखल्यांनीं व उदाहरणांनीं वाचकांस सुलभ करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु या सर्व स्पष्टीकरणामध्यें सत्य आणि असत्य यांचें अशा अजब तन्हेनें मिश्रण झालेलें आहे व मिल्लची शब्दयोजनाही कित्येक ठिकाणीं इतक्या घोंटाळ्याची व संदिग्ध आहे कीं, मिलल्या प्रमेयांतील सत्य व असत्य निवडून काढणें फार बिकट काम आहे. प्रथमतः उत्पत्तीचा प्रश्न सोडविण्याच्या मिषानें या प्रमेयांत मिल्लनें वांटणीचे प्रश्न हातीं घेतलेले आहेत. शिवाय या सर्व विवचनांत ' भांडवल व श्रम यांचें पूर्ण परिवर्तन ' व ' मजुरीफंड ' या नांवांचीं दोन तत्वें गृहीत धरलीं आहेत व या दोन तत्वांच्या सत्यत्वाबद्दल पुष्कळ अर्थशास्त्रकारांचा प्रतिकूल अभिप्राय पडलेला आहे. तरी पण या सर्व वादांत आतांच न पडतां मिल्लच्या प्रमेयांचा सरळ अर्थ काय आहे व त्याची सत्यता कोठपर्यंत आहे हें थोडक्यांत दाखविणें इष्ट आहे.
 मिल्लचें पहिलें प्रमेय असें आहे. देशांतील उद्योगधंद्याच्या वाढीची मर्यादा देशामध्यें अस्तित्वांत असलेल्या भांडवलावर अवलंबून आहे. ह्मणजे देशांत जितकें भांडवल आहे त्याच्या सीमेपर्यंतच उद्योगधंदे देशांत वाढूं शकतील. हें प्रमेय भांडवलाच्या एका सत्यापासून तर्कानेच निष्पन्न होतें .भांडवल हें जर संपत्ती एक अवश्यक कारण आहें, तर उद्योगधंद्याची व संपत्तीची वाढ, त्याचें कारण जें भांडवल त्याच्या वाढीखेरीज होणार नाहीं हें उघड आहे. खरोखरी एक विधान दुसऱ्या विधानाच्या अर्थांतून निघतें. अर्थात् हीं दीन विधानें एकाच अर्थाचीं पर्याय विधानें आहेत. परंतु हें प्रमेय प्रतिपादन करतांना मिल्लच्या मतापुढें खुला व्यापार व संरक्षण या वादग्रस्त प्रश्नांचे मनोमय चित्र सारखें उभें होतें असें दिसतें; व संरक्षणमताचें खंडण करण्याकरितां व त्या मतांतील हेत्वाभास दाखविण्याकारतां मिल्लने हें अगदीं स्पष्ट प्रमेय नव्या शोधाप्रमाणें मोठ्या जोरानें पुढें आणिलें. उदीमपंथानें समाजामध्यें एक सामान्य समज पसरून ठेविलेला होता. तो हा कीं, उद्योगधंद्यांची वाढ