पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/85

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[७३]

 भांडवलाच्या या तीन प्रकारांपैकी धनोपत्तीशी प्रत्यक्ष कर्यकारण- संबंध धनोत्पादक भांडवलाचाच आहे व अर्थशास्त्रकार ज्या वेळीं भांडवल या शब्दाचा उपयोग करतात त्या वेळी हा धनोत्पादक प्रकारच त्यांच्या डोळ्यांपुढे असतो. याच प्रकाराचे दोन पोटभेद अर्थशास्त्रकार करितात.
 धनोत्पादक भांडवल दोन तऱ्हेचे असते. एक स्थिर व एक चल. ज्या भांडवलापासून एकसारखी पुष्कळ काळपर्यंत संपत्तीची परंपरा उत्पन्न होते तें स्थिर भांडवल होय. कारखान्याची इमारत, यंत्रे, ह्त्यारे व इतर स्थायिक उपकरणे ही या सदरांत येतात. ही पुष्कळ काळपर्यंत टिक- णारी असतात व यांचेपासून एकसारखें धनोत्पादन होऊ शकते. मात्र या स्थायिक भांडवलाची होणारी मोडतोड, नासधूस यांची ; नेहमीं दुरुस्ती करीत राहिलें पाहिजे हे उघड आहे. ज्यापासून एकदांच धनोत्पादन होते तें चलभांडवल होय.कारखान्यांतला कच्चा माल,मजुरांची मजुरी व उत्पन्न केलेला पक्का माल ही सर्व 'चलभांडवल' या सदरांत येतात. एकदां एक कातड्याचा बूट, जोडा अगर पिशवी झाली म्हणजे ते भांडवल नाहींसें झाले. तसेंच मजुरांना एक मजुरी दिली म्हणजे ते भांडवल संपलें व एकदा कारखानदाराने आपला पक्का माल विकला म्हणजे त्याचे ते भांडवल संपलें.
 भांडवलासंबंधीं आणखीही पुष्कळ वादग्रस्त प्रश्न आहेत. भांडवल हें नेहेमीं श्रमाचेंच फळ असले पाहिजे किंवा काय व भांडवल या सदरांत जमीन व सृष्टीच्या इतर फुकट देणाग्या यांचा समावेश करावयाचा किंवा नाही, हे प्रश्न खरोखरी वादग्रस्त नाहीत.सामान्य व्यवहारामध्ये या सर्वांचा समावेश भांडवलांत करतात खरा; परंतु सृष्टीच्या फुकट देणग्या व विशेषतः जमीन यांचे धनोत्पादनाचे कार्य इतर भांडवलांपेक्षां इतक्या निराळ्या प्रकारचे असतें कीं, या दोहाचा एकाच नांवामध्ये समावेश करण्यापासून कांहीएक फायदा न होता उलट गोंधळ मात्र होण्याचा संभव आहे.शिवाय धनोत्पादनाचीं चार निरनिराळी कारणे सांगितल्यावर भांडवल व जमीन ही निरनिराळीं समजणेच इष्ट आहे.
 येथपर्यंत भांडवलाच्या व्याख्येचा व तत्संबंधी एकदोन आक्षेपांचा विचार झाला. परंतु भांडवलाच यथाय स्वरूप,त्याची उत्पत्ति व विशेषतः औद्योगिक प्रगतीमध्ये त्याचा कार्यभाग या गोष्टींचा जास्त स्पष्टपणें उल-