पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/83

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[७१]


 भांडवलाचा मूळचा अर्थ मुद्दल असा आहे. म्हणजे सावकार जी रकम कर्जाऊ देतो ती त्याची मुद्दल रक्कम अगर भांडवल होय, व या मुदलापासून त्याला व्याजाच्या रुपानें वार्षिक उत्पन्न येतं, तेव्हां भांडवल म्हणजे वार्षिक उत्पन्न देणारी संपत्ति होय. अॅडाम स्मिथनें भांडवलाचा हृाच अर्थ धरला आहे; व हा अर्थ व्यवहारास धरुन आहे. कारण पहिली भांडवलाची कल्पना हीच दिसते. या दृष्टीनें सर्व संपत्तीचे दोन भाग होतात; ते भांडवल व उत्पन्न हे होत, व या दोहीं मिळून सर्व संपति होते. ज्या संपत्तीपासून वार्षिक उत्पन्न येतें तें भांडवल व जी संपत्ती मनुष्य ताबडतेाबच्या उपभोगास लावतो तें त्याचें उत्पन्न होय.
 परंतु संपत्तीच्या कारणात्रयींपैकीं जें भांडवल त्याचा अर्थ वरच्यापेक्षां थोडा संकुचित आहे. अर्थशास्त्रकारांच्या परिभाषेप्रमाणें जी जी पूर्वी उत्पन्न झालेली संपत्ती नवीन संपत्ती उत्पन्न करण्यास कारणीभूत होते ती ती सर्व संपत्ती भांडवल या नांवाखालीं मोडते. कारखान्याची इमारत, यंत्रसामुग्री, कच्चा माल व मजुरांस द्याव्या लागणा-या मजुरीचे पैसे या सर्वांचा धनोत्पादक भांडवलांत समावेश होतो. अर्वाचीन काळीं पेसे असले म्हणजे या सर्व गोष्टी सहज विकत घेतां येतात; म्हणून साधारण व्यवहारांत भांडवल म्हणजे पैसा असें समजलें जातें. अर्वाचीन काळीं। कोणाचाही धंदा किंवा कारखाना उभारावयाचा म्हणजे प्रथमतः पेशाच्या रूपानें भांडवल जमवावें लागतें. कारण असें भांडवल सज्ज असल्याखेरीज हल्लीच्या काळीं कांहीं चालावयाचें नाहीं. या दृष्टीनेंच " सर्वारम्भास्तण्डुलाः प्रस्थमूलाः ' ही म्हण प्रचारांत पडली आहे. परंतु भांडवलाचा शास्त्रांतील अर्थ म्हणजे धनोत्पादक संपत्तिसमुदाय हाच करणें इष्ट आहे.
 भांडवलाचे हे दोन प्रकार झाले. थोड्या बारकाईनें विचार केला म्हणजे आणखीही एक प्रकार दृष्टोत्पत्तीस येतो. संपत्तीचे कांहीं प्रकार अगदीं क्षणभंगुर असतात; म्हणज त्यांचा एकदां उपभोग घेतला असता ते नाश पावतात. जसें खाण्यापिण्याचे सर्व पदार्थ. परंतु कांही उपभोगाचे पदार्थ चिरकाल टिकणारे असतात, यांना चिरस्थायी उपभोगाचे पदार्थ असें म्हणतां येईल. या पदाथापासून पुष्कळ काळपर्यंत सतत उपभोग घेतां येतो. जसें घरदार, गाडीघोडा, टिकाऊ सामानसुमान, डाग-