पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[६१]

 टाकण्याच्या योग्यतेचे आहेत असें म्हणणे वेगळे. या दुस-या म्हणण्याला तज्ञ मनुष्य कांहींच मान देणार नाहीं. परंतु हीं अमूर्तकारणें ह्मणजे सर्व कारणसर्वस्व नव्हे. संपत्तीच्या वाढीस पुष्कळ मूर्तकारणें हीं लागतात व त्याशिवाय नुसत्या अमूर्त कारणाच्या आस्तित्वानेंच संपत्ती उत्पन्न होणार नाहीं हेंही निर्विवाद आहे. तेव्हां पुढील भागांत या मूर्त कारणांचा विचार करु.

भाग तिसरा.
मूर्त कारणे-जमीन

 संपत्तीच्या उत्पत्तीचीं पहिलीं मूर्त कारणें दोनच आहेत व त्यांतूनच आणखी दोन कारणें निष्पन्न होतात. पहिलीं दोन कारणें म्हणजे सृष्टी व तिच्या शक्ती वें मनुष्य व त्याच्या शक्ती. या दोहोंच्या मिलाफानेच सर्व संपत्ति उत्पन्न होते. मनुष्याला कोणतीही नवी गोष्ट जगांत उत्पन्न करतां येत नाहीं; त्याची शक्ती फक्त सृष्टींतील वस्तूंची घडामोड करुन किंवा तिच्यांत इतर फेरफार करून त्यांना नवें स्वरूप व आकार देऊं शकतें, व यालाच आपण संपत्तीची उत्पत्ती म्हणतो. समाजाच्या अगदीं बाल्यावस्थेंत संपत्तीच्या उत्पत्तीचीं हींच दोन कारणें आस्तित्वांत असतात. परंतु समाज सांपत्तिक बाबतींत वरच्या पायरीवर येऊं लागला कीं, दुस-या दोन कारणांचा प्रादुर्भाव होती व सुधारलेल्या काळांत एका दृष्टीनें याच कारणांना पहिल्या दाहापेक्षां जास्त महत्व येतें. हीं दोन कारणें म्हणजे सृष्टि शक्ती व मानवीशक्ती यांचा मिलाफ घडवून आणणारी प्रवर्तक कारण होत. ज्याच्या योगानें हा मिलाफ घडून येतो तें भांडवल व जो हा मिलाफ घडवून आणतो तो योजक अगर कारखानदार. ज्या हत्याराच्या योगानें, ज्या यंत्राच्या योगानें, ज्या उपकरणांच्या योगानें मनुष्याला सृष्टीच्या शक्तीच्या आपल्या संपत्तीच्या उत्पादनाकडे उपयोग करून घेतां येतो तें सर्व भांडवल या संज्ञत मोडतें, व जो योग्य सृष्टीच्या शक्ती, योग्य मानवी शक्ति व