पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/69

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[५७]

 रानटी स्थितींत मनुष्य व पशु यांच्या वासनांत फारसें अंतर नसतें. दोघांचीही राहण्याची तऱ्हा व उपजीविकेचे उद्योग यांमध्येंही साम्य असतें. तरी पण मनुष्यामध्यें विचारशक्ति व कल्पना हे दोन गुण विशेष आहेत. मनुष्यस्वभावांतील हे दोन गुण संस्कृतामधील दोन प्रसिद्ध सुभाषितांमध्यें मोठ्या मार्मिक रीतीनें सांगितले आहेत. मात्र विचारशक्तीऐवजी पहिल्या सुभाषितांत धर्म हा मनुष्याचा विशेष म्हणून सांगितला आहे. परंतु खरा धर्म हा नेहेमींच विचारशक्तीपासून निष्पन्न होतो. मनुष्याला विचारशक्ति आहे म्हणून तो या अनंत विश्वाच्या गुढाचा विचार करूं लागतो व त्याचें जें उत्तर त्याला सयुक्कि दिसतें त्यालाच ताे आपला धर्म मानूं लागताे. म्हणून अर्वाचीन कल्पनेला अनुसरून या सुभाषितांत थोडा फरक करून ती खालीं देतों.

     “आहारनिद्राभयमैथुनं च । सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम् |
     मतिर्हि तेषांमधिको विशेषः । मत्या विहीनाः पशुभिः समानाः ॥”
     “ साहित्यसंगीतकलाविहीनः । साक्षात्पशुः पुच्छविषाणहीनः ।
     तृणं न खादन्नपि जीवमानः । तद्भागधेयं परमं पशूनाम् ॥”

 या दोन गुणांपासून मनुष्याच्या पशुतुल्य वासनांचें किती तरी निरनिराळ्या प्रकारांत रुपांतर होतें; व शिवाय या दोन गुणांपासून आणखीही नव्या नव्या हजारों वासना उत्पन्न होतात. पशूपक्षी घरट्यांत किंवा ढोलींत राहतात. मनुष्यें प्रथमतः पशूप्रमाणेंच ढोलींत राहत असली तरी त्यांना झोंपडी बांधण्याची वासना होते व अगदीं रानटी झोंपडी व सर्वांगसुंदर अर्वाचीन राजवाडा यांमध्यें जमीनअस्मानाचें अंतर आहे व हें अंतर मनुष्याच्या विचारशक्तीचा व सौंद्र्यकल्पनेचा प्रभाव होय. इतर प्रा यांना थंडीवा-या- पासून संरक्षण करण्याकरतां केंस व लोकर हीं नैसर्गिक साधनें देवानें दिलीं आहेत. मनुष्याला आपलें संरक्षण करण्यास बाह्य साधने लागतात व पशूंच्या कातड्यापासून व झाडांच्या सालींच्या वल्कलांपासून तो हल्लींच्या हजारों ताऱ्हांच्या सुंदर कापडापर्यंत मानवी वासनांचें केवढें तरी रूपांतर झालें आहे. परंतु मानवी वासना निवळ विषयसुखाबद्दलच असतात असें नाहीं. मनुष्याच्या बुद्धीमुळे त्याच्यामध्यें किती तरी बौद्धिक वासना उत्पन्न झालेल्या आहेत. त्यामुळे मनुष्यास ज्ञानाची लालसा उत्पन्न हेातेा. त्याला पुस्तकाची व वाचनाची जरुरी लागते. सारांश, मनुष्याच्या वासनांची