पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/66

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[५४]

 बद्दल केवढा विश्वास उत्पन्न केला होता हें त्या अख्यायिकेवरुन् दिसून् येतें व असा विश्वास जेव्हां सार्वत्रिक दिसून येतो तेव्हां मालमत्ता व जीवित यांचा सरक्षितपणा पूर्णपणें स्थापन झालेला आहे, असें ह्मणतां येईल व अशा सार्वत्रिक विश्वासाने सांपत्तिकदृष्टया श्रम करण्याची व उद्योग करण्याची हुरूप लोकांमध्यें उत्पन्न होते. ही आख्यायिका हानिबालच्या काळची आहे. हानिवालानें आपल्या मोठ्या सैन्यानिशीं इटालीच्या एका भागामध्यें तळ दिला होता. रोमन राज्यकर्ते त्याचा प्रतिकार करण्याच्या तयारीत् होते; परंतु कोणत्या पक्षाचा जय होईल हें सांगणें कठिण होतें. अशा निश्चित व आणीबाणीच्या प्रसंगांत देशाचे सरकार असतांना दोन रोमन गृहस्थ ज्या जागेवर हानिबालच्या सैन्याचा तळ पडला होता त्या जागेसंबंधीं विक्रीच्या उद्योगांत गुंतलेले होत व एक गृहस्थ आपल्या मालकीची ती जमीन कांहीं किंमतीला दुस-याला विकण्याचा करार करीत होता. या आख्यायिंकेवरुन रोमन कायद्यानें लोकांच्या खासगी व्यवहारावर् केवढा परिणाम केलेला होता हें फार चांगल्या त-हेनें दिसून येतें. यामध्यें रोमन लोकांची आपल्या सरकारची सरशी होणार ही खात्री तर दिसून येते. पण याच्याहीपेक्षां जास्त महत्वाची गोष्ट ही की, या युद्धाचा परिणाम कांहींही झाला तरी आज जे आपण करार करीत आहोंत व आज जी आपण मालकीहककाची अदलाबदल करीत आहोत, त्यामध्यें रतिभरही राज्यक्रांतीनें सुद्धां बदल होणार नाहीं, कायदा आपले नवे संपादित हक पवित्र मानील अशी दृढ समजूत बहुजनसमाजामध्ये रोमन कायद्यानें उत्पन्न करून दिली होती, असें या आख्यायिकेवरून दिसून् येतें.
 या कायद्याच्या अंमलामुळेंच व त्यानें उत्पन्न केलेल्या व्यक्तीच्या मालकाहकावठ्ठलच्या दृढविश्वासानेंच रोमन साम्राज्य इतकीं शतकें टिकलें व जरी कालांतरानें रानटी टयूटन लोकांच्या हल्याखालीं रोमन पादशाहीचा हळू हळ -हास झाला व त्याचे जागी नवीं राष्ट्रॅ निर्माण झाली, तरी या नव्या राष्ट्रांमध्यें रोमन कायदा व त्याची न्यायपद्धति यांचा अंमल कायमच राहिला.
 याच्या उलट उदाहरण ह्मणजे पांशयन साम्राज्यार्च आहे, हे साम्राज्यही स्थापन झालें त्या वेळीं रोमन साम्राज्याप्रमाणे विस्तृत् व ज्या