पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[४९]

 णांचें सारसर्वस्व असें आपलें मत प्रस्थापित केलें. शेतकी हेंच संपत्तीच्या वाढीचें एकमेवाद्वितीय कारण आहे. व्यापार, भांडवल व कारखाने हे उपयोगी असले तरी अनुत्पादक आहेत. परंतु संपत्तीच्या उत्पत्तीची ही उपपत्ति उदीमपंथाच्या उपपत्तीप्रमाणें एकदेशीयच होती. उदीमपंथ व निसर्गपंथ यांच्या उपपत्तीमध्यें सत्याचा अंश नव्हता असें नाहीं. परंतु प्रत्येक पंथानें आपली उपपत्तिच सर्वास्वी खरी व दुस-याची उपपत्ति सर्वस्वी खोटी अशा त-हेचा एकदेशीय कोटिक्रम लढविल्यामुळे त्या उपपत्ति खोट्या व अतएव त्याज्य आहेत असें लोकांस वाटूं लागलें. परंतु अभिमत पंथाचा जनक अॅडम स्मिथ यानें दोन्ही मतांतील सत्याचा अंश कबूल केला व शिवाय संपत्तीच्या उत्पत्तीचें एक उपेक्षित कारण शोधून काढलें. तें कारण मानवी श्रम व श्रमविभागाचें तत्व हें होय. तेव्हांपासूनच अभिमत पंथांत व हल्लींच्या अर्थाश्स्त्रांतील बहुतेक पुस्तकांमध्यें जमीन, श्रम व भांडवल अशीं तीन संपत्तीचीं कारणें म्हणून सांगण्याचा सांप्रदाय पडला. परंतु पुढें या तीन कारणांच्या स्वरूपाबद्दल पुष्कळ वादविवाद वाढला व जेव्हां अभिमत पंथाच्या पुष्कळ मतांवर आक्षेप येऊं लागले, तेव्हां या कारणसमुच्चयाच्या पूर्णतेबद्दलही शंका उत्पन्न होऊं लागल्या; व आणखी कांहीं उपेक्षित कारणें दुस-या ग्रंथकारांनीं पुढें आणलीं. हीं कारणें पूर्वीच्या ग्रंथकारांनीं प्रमुखत्वेंकरून निर्दिष्ट केलीं नसलीं तरी तीं कारणें त्यांनीं गृहीत धरलीं होतीं. परंतु त्यांचा स्पष्ट्र उच्चार न झाल्यामुळे व अतएव तीं सर्वदा डोळ्यांपुढें न राहिल्यामुळें अभिमत अर्थशास्त्रकारांच्या विचारसरणीत कित्येक चुका झाल्या व या चुका दाखवितांना या कारणांचा प्रमुखत्वेंकरून निर्देश कांहीं अर्वाचीन ग्रंथकारांनीं केला. याप्रमाणें अभिमत पंथाच्या आक्षेपकांनीं संपत्तीच्या कारणांत भर घातली. परंतु प्रास्ताविक पुस्तकांत सांगितल्याप्रमाणें कांहीं ग्रंथकारांनीं आपण शोधून काढलेलीं कारणें म्हणजे संपत्तीच्या उत्पत्तीच्या मीमांसेचें खरें रहस्य व अभेमतपंथाची कारणमीमांसा हीं खोटीं व कुचकामाचीं अशा प्रकारची टीका केली. परंतु ही टीकाही कांहीं अंशी एककल्लीच आहे असें खालील विवेचनावरून दिसेल.
 या सर्व वादविवादाकडे जरा बारकाईनें पाहिलें तर असें दिसून येईल कीं, हा वादविवाद खरोखरी शुष्क आहे. आजपर्यंत संपत्तीच्या