पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/60

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[४८]


नाहीं, व असल्या प्रकारच्या विशिष्ट कारणांचा या पुस्तकांत आपल्याला विचार करावयाचा नाहीं, व असा विचार करणें शास्त्राला शक्यही नाहीं. अर्थशास्त्र संपत्तीच्या विशिष्ट स्वरुपाकडे लक्ष देतच नाहीं. कापड कसें होतें, धान्य कसें पिकतें, कांचेचें सामान कसें करतात किंवा पितळेचीं भांडीं कशीं तयार होतात, इत्यादि प्रश्नांचें उत्तर अर्थशास्त्र देऊं शकणार नाहीं. विशिष्ट संपत्ती कोणत्याही स्वरूपाची असो परंतु तिच्यांत कांहीं एक सामान्य गुण असतात. अशी सामान्य स्वरूपाची संपत्ती देशांतील कोणत्या परिस्थितींत समाजाच्या कोणत्या स्थानांनी व समाजाच्या कोणत्या स्वरूपामध्यें व कोणत्या सामाजिक उपायांनीं उत्पन्न होऊं शकते हें आपल्याला येथें पाहावयाचें आहे. अर्थांत् संपत्तीच्या सामाजिक व सामान्य कारणांचा या पुस्तकांत आपल्याला विचार करावयाचा आहे. हीं सामाजिक व सामान्य कारणें किती व कोणतीं असतात, त्यांचें यथार्थ स्वरूप काय,त्या कारणांच्या कोणत्या विशिष्ट गुणांवर व परिस्थितीवर संपत्तीची वाढ अवलंबून आहे; तसेंच संपत्ती वाढविणाच्या या कारणांची स्वतःची वाढ कोणत्या नियमांनुसार होते, इत्यादि पुष्कळ प्रश्नांचा येथें सविस्तर ऊहापोह करावयाचा आहे.
 वर सांगितलेंच आहे कीं, संपत्तीची कारणमीमांसा बरीच बिकट आहे. कारण ज्या मानानें एखादें कार्य हें संकीर्ण व बहुविध स्वरूपाचें असेल त्या मानानेंच त्यांचीं कारणें संकीर्ण व बहुविध असतात. जसजसें संपत्तीच्या संकीर्ण स्वरूपाचें यथार्थ ज्ञान लोकांस होऊँ लागतें तसतशीं त्याचीं बहुविध कारणेंही लोकांच्या नजरेस येऊँ लागतात, आभिमत पथांत प्रतिपादन केलेल्या कारणसमुच्चयाचा शोध अशाच त-हेनें लागला. उदीम पंथांचें लक्ष एका कारणाकडे गेलें वj संपत्तीच्या कारणांचें सारसर्वस्व त्यांत आहे असें त्यांनीं प्रतिपादन केलें. पैसा हें संपत्तीचे स्वरूप व व्यापार हें संपत्तीच्या उत्पत्तींचें साधन हें त्यांच्या मतांचें सार. म्हणजे उदीमपंथानें पैसा अगर भांडवल याचें संपत्तीच्या वाढीचे कामीं फार महत्व आहे असें शोधून काढले. परंतु हें मत एककल्ली असल्यामुळें जरी त्यांत सत्याचा अंश होता तरी त्या मताच्या अतिशयोक्तीनें तें मत खेटें असें वाटूं लागलें, व यामुळें उदीमपंथाच्या प्रतिस्पर्धी पंथानें शतकी अगर जमीन हें संपत्तीच्या कार-