पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अर्थशाश्वाचीं मूलतत्वें.
पुस्तक दुसरें.

ܕܒܨ

भाग पहिला

.

सामान्य विचार.

 प्रास्ताविक पुस्तकाच्या शेवटल्या भागांत सांगितल्याप्रमाणें या पुस्तकांत राष्ट्रीय संपत्तीच्या उत्पत्तीच्या सर्व प्रश्नांचा विचार करावयाचा आहे. यांतला प्रमुख व अत्यंत वादग्रस्त प्रक्ष संपत्तीच्या उत्पत्तीच्या कारणांचा होय. कां कीं, समाजांत उत्पन्न होणारी संपत्ती ही किती तरी बहुविध असते. तेव्हां या अशा बहुविध पदार्थांना कांहीं एक सामान्य कारण-समुच्चय असेल हैं मकद्दर्शनीं खरेंच वाटत नाहीं. ज्याप्रमाणें संपत्ती या नांवाखालीं मोडणा-या हजारों वस्तूंमधील सामान्य गुण शोधून काढणें हें बरेंच कठीण काम आहे; त्याप्रमाणें संपत्तीचीं करणें शोधून काढणें हें तितकेंच किंबहुना जास्त कठीण काम आहे; व ज्याप्रमाणें संपत्तीचा अर्थ काय असें विचारल्याबरोबर सामान्य मनुष्य जमीनजुमला, कपडालत्ता, पैसाअडका, ही संपत्ती असें चटकन् उत्तर देतो, त्याप्रमाणें संपत्तीचीं कारणें काय असें विचारल्याबरोबर सामान्य मनुष्य असें उत्तर देईल कीं, देशांतील निरानराळे धंदे व कला हीं संपत्तीची कारणं आहेत. तेव्हां या सर्व कला व हे सर्व धंदे अर्थशास्त्रांतील संपत्तीच्या उत्पत्तीच्या कारणांमध्यें येतात किंवा काय ? नाही. या कला व हैं धंदे विशिष्ट स्वरूपाच्या संपत्तीचीं कारणें आहेत. कापड कसें उत्पन्न करावें हें विणकला सांगेल. परंतु अशा विशिष्ट कलांची माहिती देणें हें अर्थाश्स्त्राचें काम