पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/57

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
[४५]

याचा आहे. सकृद्दर्शनीं या भागाशीं अर्थशास्त्राचा फारसा संबंध नाहीं असें वाटण्याचा संभव आहे. विशेषतः अलीकडे राष्ट्रीय जमाखर्च या नांवाचें नवीनच शास्त्र बनूं लागल्यापासून तर अर्थशास्त्रांत हा भाग आगंतुक आलेला आहे असें भासेल. परंतु अर्थशास्त्राच्या शास्त्रीय व्याख्येकडे थोडें लक्ष दिल्यास या शंकेचें निरसन होईल. राष्ट्रीय संपत्तीच्या स्वरूपाचा व तिच्या कारणांचा विचार करणारें शास्त्र तें अर्थशास्त्र, अशी आपण अर्थशास्त्राची व्याख्या केली आहे. परंतु राष्ट्राला दोन अंगें आहेत. एक राष्ट्रांतले सर्व लोक व दुसरें त्यांतलें सरकार, हीं दोन्हीं अंगें अगदीं परस्परसंलग्न आहेत. राष्ट्रांतील लोकांखेरीज सरकारचें अस्तित्व संभवत नाहीं; व कोणत्या तरी सरकाराखेरीज राष्ट्रत्वही संभवत नाहीं. तेव्हां राष्ट्रीय संपत्तीचेही दोन भाग होतात. एक राष्ट्रांतील सर्व लोकांची संपत्ती व एक राष्ट्रांतील सरकारची संपत्नी. केव्हां केव्हां सरकारची कांहीं संपत्ती किंवा उत्पन्न राष्ट्रांतील लोकांच्या संपत्तीपासून किंवा उत्पन्नापासून भिन्न असेल. उदाहरणार्थ, सरकारची जमीन असेल किंवा कारखाने असतील किंवा खाणी असतील, व केव्हां केव्हां सरकारचें उत्पन्न राष्ट्रांतील लोकांच्या उत्पन्नाचा एक वांटा असेल. कोणीकडूनही सरकारच्या उत्पन्नाचा विचार राष्ट्रीय संपत्नीची मीमांसा करणा-या शास्त्राच्या मार्यादेबाहेरचा नाहीं, हें उघड दिसून येईल. तेव्हां सर्व अर्थशास्त्रकारांचीं कराचीं तत्त्वें यांचें विवेचन करण्याची जी रूढी आहे तिचें युक्तीनें समर्थन करतां येण्यासारखें आहे. म्हणून आम्हीं आमच्या ग्रंथाच्या पांचव्या पुस्तकांत सरकारचें उत्पन्न व कराचीं तत्वें यांचा उहापोह करणार आहों.
 या ग्रंथाच्या सहाव्या पुस्तकांत हिंदुस्थानचें अर्थशास्त्र याचा विचार करावयाचा आहे. अर्थशास्त्राचीं कोणतीं तत्त्वें सध्या हिंदुस्थानाला लागू करतां येण्यासारखीं आहेत हें ठरवावयाचें आहे. परंतु हें ठविण्याकरतां हिंदुस्थानच्या पूर्वीच्या औद्योगिक स्थितीचें थोडेंसें पर्यालाेचन केलें पाहिजे, व सध्याची हिंदुस्थानची सांपत्तिक स्थिती कशी आहे व ती सुधारण्याकरितां अर्थशास्त्राचीं कोणतीं तत्वें हिंदुस्थानच्या सध्याच्या सांपत्तिक स्थितींत हिंदुस्थानाला लागू करणें हिंताचें आहे, याचा ऊहापोह या शेवटल्या पुस्तकांत करावयाचा आहे. हें पुस्तक केवळ शास्त्रीय नाहीं हें उघड आहे. परंतु यामध्यें शास्त्र व व्यवहार यांचा मिलाफ करण्याचा