पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/543

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


[५२७] तर बहिष्कार हा तामसवृत्तीचा दर्शक आहे; स्वदेशी खऱ्या स्वदेशाभिमानाची सूचक आहे तर बहिष्कार परदेशाच्या वैराचा सूचक आहे; स्वदेशी ही संयोजक शक्ति आहे तर बहिष्कार ही भेदक शक्ति आहे; स्वदेशी ही सहिष्णुतावर्धक आहे तर बहिष्कार हा असहिष्णुतावर्धक आहे; सारांश, स्वदेशीची भावना अर्थशास्त्रदृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, राजकीय दृष्टया सर्वांशीं हितकारक व प्रवर्तक भावना आहे; तर बहिष्कार ही अर्थशास्त्रदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, व राजकीयदृष्टया अहितकारक व म्हणूनच प्रतिगामी भावना आहे तरी देशाच्या सद्य:सांपत्तिक स्थितीच्या सुधारणेच्या मार्गांत अशा हितकर प्रवृत्तीचा लोकांनीं उपयोग करून घेणें श्रेयस्करच होईल. व असा उपयोग करून घेण्याची बुद्धि आमच्या देशांतील लोकांना होईल अशी आशा प्रदर्शित करून या शेवटल्या पुस्तकाचा हा उपायचिंतनाचा विचार येथेंच थांबवून व या ग्रंथाची समाप्ति करून वाचकांची रजा घेतों.