पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/540

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[५२४] हल्लीं हिंदुस्थानांत पूर्णपणें वास करीत आहेत यामध्यें संशय नाहीं. या दोन्ही गोष्टी ब्रिटिश सुधारलेली राज्यव्यवस्था व पाश्चात्य शिक्षण यांनीं घडवून आणल्या आहेत.तेव्हां त्यासंबंधानें अधिक कांहींएक कर्तव्य राहिलें नाहीं. संपत्तीचीं मूर्ती कारणें चार आहेत, त्यांपैकीं सृष्टिशक्ति अगर कच्चा माल हिंदुस्थानांत हवा तेवढा आहे. हा कच्चा माल परदेशीं जाऊन त्याचा पक्का माल होऊन आयात होत आहे हा मुळीं हिंदुस्थानच्या अवनतीची गुरुकिल्ली आहे. तेव्हां या सर्व कच्च्या मालाचा येथेंच पक्का माल होऊं लागला ह्मणजे हिंदुस्थानची सांपत्तिक स्थिति हां हां ह्मणतां सुधारेल. परंतु हें घडून येण्यास अडचणी फार आहेत. तसेंच येथें शेतीच्या सुधारणेसही अवसर बराच आहे. कारण सुधारलेल्या देशांच्या मानानें येथें दर एकरीं शेतीचं उत्पन्न फारच कमी आहे. तेव्हा हें उत्पन्न वाढविणें हें एक औद्योगिक प्रगतीचें जरूर काम आहे व सरकार यासंबंधीं हल्लीं बरीच खटपट करीत आहे. सुधारलेल्या शेतीचें ज्ञान वाढविण्याकरितां व त्याचा प्रसार करण्याकरितां सरकार प्रयत्न करीत आहे. यामध्यें लोकांनीं सहकारत्वानें काम केलें पाहिजे. परंतु या नवीन ज्ञानाचा शेतकरीवर्गास मिळावा तितका अजून फायदा मिळत नाहीं. याच्या मुळाशीं त्यांचें अज्ञान आहे. संपत्तीच्या वाढीचें दुसरें कारण जो श्रम तो या देशांत पुष्कळ आहे. कारण नुसत्या ब्रिटिश इंडियाचीच लोकसंख्या २३ कोटींवर आहे. परंतु आमच्या देशांतील मजूरवर्ग कमी कर्तबगारीचा आहे व त्याची कार्यक्षमता वाढविणें हृणजे संपत्तीच्या वाढीस मदत करणें होय व मजुरांची कार्यक्षमता वाढविण्याचा एक रामबाण उपाय ह्मणजे त्या वर्गामध्यें प्राथमिक शिक्षण--सामान्य व औद्योगिक-याचा प्रसार करणें होय. व हा सार्वत्रिक शिक्षणाचा प्रक्ष सरकारनें हातीं घेतल्याखेरीज सुटणारा नाहीं. तेव्हां प्राथमिक शिक्षण सार्वत्रिक व सक्तींचें करणें हा एक संपत्तीच्या वाढीचाच मार्ग आहे. हिंदुस्थान सरकार या शिक्षणाच्या प्रक्षाकडे अझून राजकीय व लष्करी दृष्टीनें पहात आहे. परंतु औद्योगिक बाबतींत पुढारलेले देश सामान्य शिक्षणाकडे औद्योगिक दृष्टीनें पहातात. तरी लोकांच्या पुढा-यांनीं या प्रश्नाचीही औद्योगिक बाजू सरकारपुढें मांडली पाहिजे. सामान्य लोकशिक्षण हा एक श्रमाची कार्यक्षमता वाढविण्याचा मार्ग आहे व जर सरकार या उपायाकडे काना-