पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/537

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[५२१] मजुरी वाढल्यासारखीच झाली. परंतु पुढें या जिनसा जर धन्यानें देण्याचें कमी केलें तर त्याचा पैशांतला पगार वाढविणें अवश्य आहे. तरच त्याची जुनी मजुरी त्याला मिळाल्यासारखें होईल. नाहीं तर त्यांची मजुरी कमी होऊन त्याला जास्त दारिद्रय येईल. जंगलखात्याच्या स्थापनेनें येथल्या शेतकरी वर्गावर अशाच तन्हेचा परिणाम झाला. ज्या गोष्टी पूर्वीं त्यांना सृष्टीच्या देणग्या ह्मणून मिळत त्या जंगल सरकारचें झाल्यानें नाहींशा झाल्या व त्याबद्दल त्याला किंमत द्यावी लागूं लागली. गुरचराईची फी झाली, लाकुडफांट्याच्या परवान्याला फी सुरू झाली. म्हणजे हा भाग शेताच्या उत्पन्नांतून त्याला द्यावा लागला. वास्तविक जंगलखात्याची स्थापना झाल्यानें सृष्टिदेणगी शेतक-याची कमी झाली म्हणून न्यायानें त्यांचा सारा कमी करावयास पाहिजे होता. वरील कारणांनीं शेतें स्वतः करणा-या वर्गाची स्थिात पूर्वीच्या काळापेक्षां वाईट झालेली आहे यांत शंका नाहीं. कारण पूर्वींच्या काळीं त्यांना शेताची मालकी असल्यामुळें जो फायदा रहात असे, तो दुस-या वर्गामध्यें म्हणजे सावकार व पांढरपेशा वर्ग यांमध्यें वाटला गेला आहे. हिंदी मुत्सद्दी शेतक-याची स्थिति खालावत चालली आहे असें कां म्हणतात हें वरील विवेचनावरून दिसून येईल. व हें म्हणणें सर्व देशांतील एकंदर शेतक-यांबद्दल बरोबर आहे. कारण वर निर्दिष्ट केलेली कारणपरंपरा सर्वत्र लागू होती. आतां कांहीं कांहीं प्रांतांत शेतीच्या लागवडीत फरक झाल्यानें थोडी फार सुधारणा झाली आहे हें खोटें नाहीं. उदाहरणार्थ, बंगालमध्यें कायम धाऱ्यांची पद्धत आहे. यामुळे जरी जमीनदाराचें उत्पन्न पुष्कळ वाढल असलें तरी या कायमच्या धाऱ्याच्या पद्धतीचा फायदा तेथल्या शेतक-यांसही मिळाला आहे हें दत्तासारख्या त्या प्रांतांची पूर्ण माहिती असलेल्या सरकारी अंमलदाराचें हृाणणें आहे. तसेंच जेथें हलक्या प्रतीच्या पिकाऐवजीं शेतकरी लोक वरच्या प्रतीचें पीक करूं लागले आहेत, जेथें पिकाच्या फरकामुळे अजून जमीनधाऱ्यांत वाढ झाली नाहीं तेथेंही शेतक-यांची स्थिति किंचित सुधारली आहे. उदाहरणार्थ,व-हाड व खानदेश हे भाग घ्या. येथें दर वर्षास कापसाची लागवड वाढत आहे. पूर्वीं खानदेशांतून धान्य बाहेर जात असे. हल्लीं खानदेशाला बहुतेक इंग्लंडची अवस्था आली आहे.