पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/530

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कारण ब्राझीलमधल्या स्वस्त कॉफीनें व जर्मनीमध्यें रासायनिक पद्धतीनें निळीचे स्वस्त रंग बनविण्याचे कारखाने निघाल्यापासून या दोन धंद्यांची पीछेहाट होत गेली. तसेंच १८६२ मध्यें कोयनेलच्या झाडांची लागवड मोठ्या प्रमाणावर होऊं लागली.

        परंतु याच काळांत या कृषिज संपत्तीपेक्षां विशेष महत्वाच्या अशा दोन खनिज संपत्तीचा शोध लागून त्यांचा झपाट्यानें प्रसार झाला.हे दोन खनिज पदार्थ म्हणजे राकेल व दगडी कोळसा हे होत. हिंदुस्थानांत हे खनिज पदार्थही १८५० ते १८६० च्या दरम्यानच मोठ्या प्रमाणावर खाणींतून बाहेर पडूं लागले.
       या काळापूर्वीच माहीत झालेले परंतु याच काळांत ज्यांची लागवड विशेय जोरानें होऊं लागली असे कृषिज पदार्थ म्हणजे तंबाखू व तांग हे होत. यांपैकीं दुस-याचा हिंदुस्थानाला जणूं कांहीं पूर्ण मक्ताच मिळून हें पीक बंगाल्यांत सर्वत्र पसरलें व गोणपाटें व इतर कापड तयार करणारे कारखानेही बंगाल्यांत जागोजाग झाले. या सर्व नव्या व जुन्या कृषिज व खनिज संपत्तीची वाढ या पर्वांमध्यें झपाट्यानें झाली ही गोष्टही अांकड्यांनीं सिद्ध करतां येते.
      या काळांतील एका दृष्टीनें अत्यंत मोठा विशेष म्हणजे हिंदुस्थानांतील पाश्चात्य शिक्षणाचा प्रसार होय. हिंदुस्थानांतील सर्व विश्वविद्यालयें १९५० च्या नंतरची आहेत. शिक्षणखात्याचा जोराचा प्रसार याच काळानंतर झाला. कांहीं कांहीं प्रांतांत यापूर्वीही पाश्चात्य शिक्षणाला सुरुवात झाली होती हैं खरें आहे, तरी मोठ्या प्रमाणावर शिक्षणाचा प्रसार याच काळांत झाला हें सर्वश्रुतच आहे. व या शिक्षणाचा परिणाम देशांतील सांपत्तिक स्थितीवर झाल्यावांचून राहिला नाहीं. पाश्चात्य शिक्षणानें लोकांमध्यें नव्या नव्या कल्पना उद्भवूं लागल्या व मानसिक कल्पनांच्या विस्तारानें मानवी गरजा, अभिरुचि व वासना यांची वाढ होते असा सावत्रिक

नियम अहे. त्याप्रमाणंच शिकलेल्यांच्या व त्यांच्या सहवासानें व अनुकरणानें दुसऱ्यांच्याही गरजा पुष्कळ वाढल्या. यामुळे पूर्वीची साधी राहणी राहिली नाहीं. तसेंच देशांत शांतता स्थापित झाल्यापासून पैसे पुरून ठेव