पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/527

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ५११ ] दे माय धरणी ठाय झालें. हा प्रभाव इंग्रज लोकांच्या आपल्या हक्काबद्दलच्या जागृतीचा व कायद्याप्रमाणें अंमलबजावणी करण्याच्या प्रवृत्तीचा आहे. पूर्वीच्या हिंदू किंवा मुसलमान राजांच्या काळीं कमाल जमाबंदी इंग्रजी अमलापेक्षा कदाचित् जास्त असेल; परंतु ती फक्त कागदोपत्री होती. त्याची अंमलबजावणी कडक त-हेनें होत नसे.

     यामुळे कंपनीच्या अवल अमदानींत शेतसाऱ्याबद्दल लोकांना फार त्रास व हाल भोगावे लागत् अशाबद्दल पुरावा आहे. साऱ्याची कडक वसुली ही सा-याच्या रकमेपेक्षां लोकांना जास्त जाचक होइ व लोक आपापलीं शेतें सोडून रानांत जात असत, व या सा-याच्या कदरीमुळे त्यांना सावकाराचें दार पाहावें लागे व शेतक-यांच्या कर्जबाजारीपणास एव्हांपासून सुरुवात झाली. तेव्हां कंपनी सरकारच्या कारकीर्दीमध्यें- ही कारकीर्द म्हणजे हिंदुस्थानची एक प्रकारें संक्रमणावस्था होती-शेतक-यांची, कारागिर लेकांची व मध्यम वर्गाची, अशा तिन्ही वर्गाची स्थिति खालावत चालली होती हें वरील विवेचनावरून दिसून येईल.
     येथपर्पत हिंदुस्थानच्या औद्योगिक इतिहासाच्या दुस-या पर्वाचे थोडक्यांत सिंहावलोकन केलें. १७५० ते १८५० हीं शंभर वर्षे हिंदुस्थानला राजकीय दृष्ट्या वाईट गेलीं; इतकेंच नाहीं तर तीं सांपत्तिक दृष्ट्याही वाईट गेली. या शंभर वर्षात सर्व हिंदुस्थानचें राज्य हळूहळू हिंदी व मुसलमान राजांच्या हातून ईस्ट इंडिया कंपनीच्या हातीं गेलें व बाकी जे संस्थानिक राहिले ते कंपनी सरकारचे मांडलिक बनले. ही क्रांति होत असतांना देशांत कमीअधिक प्रमाणावर सारख्या लढाया चालू होत्या व देशांती एकंदर सर्व बहुजनसमाजाची सांपत्तिक स्थिति खालावत होती. पर या सर्व राजकीय व सांपत्तिक अवनतीची लोकांना कल्पना नव्हती. कारण पुढील पर्वांत जो पाश्चात्य शिक्षणप्रसार झाला तो त्या काळीं झालेल नव्हता. सर्व हिंदुस्थानचे रहिवाशी अज्ञानांधःकारांत गढून गेलेले हो व देश व त्याची सांपतिक स्थिति किंवा राजकीय स्थिति याचा विचार करण्यासारखा जनमनाची तयारीच झाली नव्हती. म्हणून मागें एका दाखल्यांत सांगितल्याप्रमाणें हिंदुस्थान पहिल्या पर्वांत औद्योगिक आरोग्यांत होतें; या पर्वात व्याला औद्योगिक रोग होऊन तें अगदी  बेशुद्ध पडून  राहिलें होतें व हल्लीच्या  काळीं सुशिक्षित हिंदुस्थानच्या औद्योगिक अव