पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/526

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ሤጿo ] कारभार स्वतःच पाहूं लागलें, यामुळे शेतकरी वर्गावर एक अनिष्ट परिणाम झाला. त्याचें बीज पाश्चात्य सुधारणेच्या एका कल्पनेंत आहे.

 पाश्चात्य सुधारणेचा हा एक विशेष दिसून येतो कीं, व्यक्तीच्या हक्काच्या कल्पनेची पूर्णवाढ झाली आहे व प्रत्येक व्यक्ती  आपआपले संपादिलेले हक्क कडक रीतीनें बजाविते. इंग्रज लोकांमध्यें तर हा गुण जास्तच परिणत झालेला आहे. इंग्रज लोकांनीं राजापासून एकदां एखादा हक्क मिळविला, कीं तो ते पुढें कधीही गमावीत नसत व त्याचा नेहमीं उपभोग घेत व त्या पहिल्या हक्काच्या  जोरावर आणखी हक्क  मिळवीत. अशा क्रमांनें इंग्लडनें आपल्याला पूर्ण राजकीय स्वातंत्र्य मिळविलें व आपलें राज्य वस्तुतः प्रजासत्ताक केलें. या इंग्रजांच्या विशिष्ट गुणामुळेच त्यांचें साम्राज्य सर्व जगभर पसरलें आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं.
    जेव्हां कंपनी सरकार आपल्या ताब्यांतील मुलखाचा स्वतः कारभार पाहूं लागलें तेव्हां त्यांनीं सारा रुपयांमध्यें ठरविला व जो एकदां सारा ठरला तो नियमितपणें व वेळच्यावेळीं दिलाच पाहिजे असा सक्त नियम झाला. आतां इकडल्या शेतक-यांना ही कराराच्या अटीची कल्पना मुळींच नव्हती. सारा द्यावयाचा खरा परंतु तो आपल्या सवलतीप्रमाणें व सवडीप्रमाणें द्यावयाचा, बरें येथल्या सरकारचा कारभार तरी फारसा कडक नसे. हा आपला हक्क  आहे व त्याची अंमलबजावणी एकदम झालीच पाहिजे, अशी कदर दोन्ही पक्षांला नव्हती. सारांश, प्रजा ज्याप्रमाणें साध्याभोळ्या स्वभावाची होती, त्याप्रमाणें सरकारी कारभारही सवलतीचा व सौम्य होता. म्हणजे कारभार व प्रजा हा उत्क्रांति तत्त्वानुरूप परस्परांशीं समानरूप झालेली होती; परंतु कंपनी सरकराच्या राज्यांपासून राज्यकारभार सुधारलेल्या कडक कर्तबगारीचा तर लोक मात्र जुन्या भोळवट जातीचे असा विषम प्रकार झाला. याचा परिणाम प्रजाजनांस फार त्रासदायक झाला. याचें प्रत्यांतर हल्लींच्या एका उदाहरणावरुन येईल. बोअर लोकांचें ट्रान्सवालमध्यें राज्य होतें तेव्हां सुद्ध हिंदी वसाहतवाल्यांबद्दल पुष्कळ कडक नियम होते, परंतु ते नुसते कागदोपत्री  होते. त्यांची कडक अंमलबजावणी बोअर सरकार करीत नव्हतें; व हिंदी रहिवाशांना त्या अमलांत ह्मणण्यासारखा प्रत्यक्ष त्रास झाला नाही. तेंच दोन वर्षांनंतर इंग्रज सरकार कारभारी झाल्यापासून हिंदी रहिवाशांना