पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/523

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ५०७ ]

   Soon after this the whole aspect of the cotton trade of the world had changed and India, then fell into a position of very secondary importance. Instead of furnishing Europe with cotton goods, she now became dependent on England for her own supplies a remarkable instance of the triumph of improved mechanical contrivances and intelligent agriculture over hereditary skill and primitive traditions.”

— Imperial Gazetteer of India, Vol. III.

   अशा प्रकारची हिंदुस्थानामध्यें कंपनी सरकारचा अंमल सुरू असतांना क्रांति घडून येत होती. कंपनी सरकारच्या अमलापासूनही कांहीं अनिष्ट प्रकार घडून आले. पूर्वीचे मुसलमान राजे कितीही जुलमी असले तरी ते देशांतच रहात असत व त्यांनीं बेतलेले कर पुनः लोकांमध्यें निरनिराळ्या रूपांनीं परत येत. शिवाय कलाकौशल्याच्या कारागिरांना त्यांच्या कारकीर्दीमध्यें उत्तेजन मिळे. सर्व सरकारी नोकर एतद्वेशीय असल्यामुळेच सरकारच्या खजिन्यांतील पैसा देशांतील लोकांनाच परत मिळे. हिंदुस्थानचें राज्य कंपनी सरकारच्या ताब्यांत गेल्यापासून अगदीं निराळी स्थिति झाली. आधीं कंपनीचा व्यापारी पेशा होता व पुढें कंपनीला राज्याधिकार मिळाला. परंतु मेकॉलेसाहेबांनीं म्हटल्याप्रमाणें व्यापारी पेशा व राज्याधिकार या अमृतविषासारख्या परस्पर विरोधी गोष्टी आहेत. यामुळें दोन्ही कामें कंपनीकडून वाईट तऱ्हेनें झालीं. व्यापार बरोबर साधला नाहीं व राज्यकर्त्यांचीही कर्तव्यकर्में बरोबर झालीं नाहींत. कंपनीच्या डायरेक्टर लोकांचें लक्ष पुष्कळ व्याज मिळण्याकडे असे. परंतु व्यापारांत तर कांहींच फायदा नाहीं. तेव्हां व्याज राज्याच्या करवसुलांतून जाऊं लागले. शिवाय राज्याविस्तार होत असतांना पुष्कळ लढाया कराव्या लागत. त्यांचा खर्च होतां होईतों आपलें नवें भांडवलाच समजून त्याच्यावर व्याज मिळविलें जात असे. याप्रमाणें एकीकडे राज्य काबीज करावयाचें व तें काबीज करण्याला लागणारा पैसा हिंदुस्थान देशाचें राष्ट्रीय कर्ज समजावयाचें असा दुहेरी तोटा हिंदुस्थानचा होत होता. राजाचीं कर्तवव्याकर्में करण्याची बुद्धि कंपनी सरकारला होत नसे. अंतर्व्यवस्था