पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/519

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[५०३] नाव शेर आणे पै पीठ २५ ३ ९ डाळ ५ ० ७ १/२ तूप १ १ १/२ मीठ १ ० २ ४/५

                   ५       ७ ४/५

म्हणजे प्रत्येक माणशीं दर महिन्यास ६ आणे खर्च पुरे. आतां कुटुंबाचीं ५ माणसें धरलीं-नवरा बायको व ३ मुलें-तर कुटुंबाचा खर्च दरमहा सवा रुपया होतो व अगदीं सामान्य मजुराची मजुरी वरील कोष्टकांत दिल्या प्रमाणानें दरमहा १ रुपया ९ आणे होते. अर्थात दरमहा ५ आणे त्याला इतर सुखसोईच्या विक्रीस रहात व त्या काळीं पैशाच्या मोठ्या मोलाकडे पाहातां दरमहा ५ आणे हा इतर खर्चाला पुष्कळ आहे. परंतु ही झाली अगदीं निवळ सांगकाम्या मजुराची गेोष्ट. अकबराच्या काळीं कामदाराची सांपत्तिक स्थिति ब-याच वरच्या दर्जाची होती असें वरील कोष्टकावरून दिसतें. या वेळच्या निरनिराळ्या प्रवाशांनीं लिहून ठेविलेल्या प्रवासाच्या हकीकतींवरून व उद्वारांवरून हेंच अनुमान निघतें कीं, हिंदुस्थानच्या इतिहासाच्या या पहिल्या पर्वात बहुजनसमाजाची सांपत्तिक स्थिति ब-या प्रकारची असावी. देशांत नाणीं फारच कमी होतीं व यामुळे त्यांचें मोल फार होतें व म्हणून सर्व पदार्थाची स्वस्ताई होती व मजुरीही कमी असे; परंतु त्या मजुरीचें खरे मोल अगर क्रयणशक्ति मोठी होती. हिंदुस्थानच्या इतिहासाच्या दुस-या पर्वांतील औद्योगिक स्थितीची बरोबर कल्पना होण्यास युरोपांत किंचित् त्याचे आधीं व विशेषतः त्या पर्वांमध्यें कसकसे फेरफार होत गेले, त्याचेंही थोडें सिंहावलोकन केलें पाहिजे म्हणजे या दुस-या पर्वात हिंदुस्थानची अवनति कां झाली हे ध्यानांत येईल. हिंदुस्थानचा नवा जलमार्ग व अमेरिका खंड यांच्या शोधांपासून युरोपांत औद्योगिक जागृति झाली व तेव्हांपासून युरोपच्या औद्योगिक प्रगतीस आरंभ झाला. त्यांतल्यात्यांत हॉलंड व इंग्लंड या देशांत या सुधारणेस