पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/517

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ५०१ ] शिवाय त्या काळीं राजांराजांमध्यें लढाया वारंवार होत असत, यामुळे लोकसंख्या साहजिक कमी होई. यामुळे शेतकीवर जास्त लोकांचा मारा पडत नव्हता, व म्हणून मागे राहिलेले लोक यांची स्थिति चांगली राही. अवर्षणानें दुष्काळ पडत, परंतु त्यांची तीव्रता इतकी भासत नसे. कारण देशांत धान्य लोकसंख्येला पुरून उरे इतकें तयार होई व शिल्लक राहिलेलें धान्य पेवांत ठेवण्याची सार्वत्रिक रीत असे. कारण त्या काळीं हल्लीसारखी सुलभ दळणवळणाचा साधन नसल्यामुळे धान्यासारख्या मोठ्या आकाराचा वजनाचा माल बाहर देशीं जाणें शक्य नव्हतें. देशामध्यें एकंदर लोकसंख्या किती व एकंदर संपत्तीची उत्पत्ति किती व दरमाणशी संपत्तीचे मं किवा उत्पन्न काय पडे हे अजमावण्यास साधन नाहीं. कारण त्या काळीं लोकांना किंवा सरकारला अर्वाचीन काळच्या खानेसुमारीसारख्या पद्धति अवगत नव्हत्या. परंतु त्या काळीं आलेल्या परदेशच्या प्रवाशांनीं हिंदुस्थानच्या लोकांविषयीं जी माहिती लिहून ठेविली आहे, त्यावरून लोक त्या काळीं साधारणतः सुखी होते व बरेच संपत्तिमान होते व संपत्तीची वांटणी फारशी असमतेची नव्हती असें म्हणणे भाग आहे.या म्हणण्याच्या प्रत्यंतराकरितां ऐने अकबरींतून घेतलली खालील माहिती बरीच उपयोगी पडेल असें वाटतें. या माहितोवरून अकबराच्या कारकीर्दीमध्यें लोकांची सांपत्तिक स्थिति कशी होती याचें बरेंच चांगलें अनुमान काढण्यास जागा आहे. अकबराच्या कारकीर्दीतील कांहीं कामगारांच्या मजुरीची खालील कोष्टकावरून कल्पना यईल. कामदाराचे नांव. दररोजची मजुरी

             आणे  पै              आणे  पै

गवंडी ... ... २ ११ पासून ते ० ८ सुतार ... ... २ ११ ... ० १० पाथरवट... ... २ ६ ... २ १ बेलदार ... ... १ ६ ... १ ३ विहीरखणणारे... ० ० ... ० ६ बुरुड ... ... ० ० ... ० १० भिस्ती ... ... १ ३ ... ० १० सामन्य मजूर ... ० ० ... ० १०