पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/513

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ છ૨૭ ] चुकीस पात्र असतात व त्याप्रमाणें ब्रिटिश राज्यव्यवस्थेंत पुष्कळ चुक्या होणें स्वाभाविक आहे; परंतु असल्या चुक्या लपवून आपल्या म्हणण्याचा विपर्यास होऊ नये, या शुद्ध हेतूनें कां होईना, परंतु सत्याचा अपलाप करण्यापासून कांहींएक फायदा होत नाहीं. उलट केव्हांना केव्हां तरी सत्य हें बाहेर येतें व शुद्ध हेतूनें सत्य मार्गे ठेवणारांचा हेतु तडीस न जातां, उलट त्यानें ज्या इतर चांगल्या व हितकर गोष्टी लिहिल्या असतील त्यावरील मात्र लोकांचा विश्वास उडतो. बर्कनें म्हटल्याप्रमाणें स्तुति ही स्तुति करणारास किंवा स्तुति स्वीकारणारास दोघांनाही कमीपणा आणणारी आहे. तीच गोष्ट अशा ठिकाणींही लागू आहे व याच बुद्धीनें जें सत्याला धरून आहे अशी या लेखकाची समजूत आहे तेंच या एकंदर ग्रंथांत व या शेवटल्या पुस्तकांत सदर लेखकानें ग्रथित केलें आहे. शेवटीं, या विषयाचें सविस्तर विवेचन या शेवटल्या लहानशा पुस्तकांत होणें शक्य नाहीं हें लेखक जाणून आहे. हा विषय इतका गहन, विकट व अवघड आहे कीं, त्याचें यथास्थित विवेचन करण्यास एक मोठा प्रचंड स्वतंत्र ग्रंथच लिहिला पाहिजे. परंतु हें या लेखकाच्या आटोक्याबाहेरचें काम आहे. येथें लेखकानें आपल्या थोड्याबहुत अवलोकनानें, कमीजास्त व्यासंगानें व थोड्याफार विचारानें हिंदुस्थानच्या सांपत्तिक स्थितीबद्दल जीं अनुमानें काढलीं आहेत, त्यांचें थोडक्यांत व संक्षेपतः निरूपण करून वाचकांची रजा घेण्याचा विचार केला आहे. येवढी आवश्यक असलेली प्रस्तावना करून आतां या कठिण विषयाकडे वळू. या पुस्तकांतील प्रतिपाद्य विषयाचे स्वाभाविक दोन भाग पडतात हिंदुस्थानूची सद्य: सांपत्तिक स्थिति कशी आहे हा पहिला भाग व मग ही स्थितेि सुधारण्यास अर्थशास्त्रदृष्टया योग्य अशी उपाययोजना कोणती करावी हा दुसरा भाग. परंतु हिंदुस्थानच्या सद्यः सांपत्तिक स्थितीचें यथार्थ स्वरुप समजण्यास हिंदुस्थानच्या औद्याेगिक स्थितीची पूर्वपीठिका समजली पाहिजे. परंतु ही पीठिका फार लांबवर गेलेली आहे. कारण औद्योगिक स्थितीच्या बाबतींत हिंदुस्थान व युरोपांतील अर्वाचीन राष्ट्रे यांमध्यें पुष्कळ अंतर आहे. युरोपियन राष्ट्रांची सुधारणा व सांपत्तिक प्रगति ही बरीच अली ३२