पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/50

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
भाग तिसरा.
संपत्ति म्हणजे काय?

 अर्थ, धन, संपत्ति हे किंवा असेच दुसरे पुष्कळ शब्द सामान्य व्यवहारांत लोक समानार्थक म्हणून वापरतात. व यांचा अर्थ काय असें विचारलें असतां घरेंदारें, जमीनजुमला, पैसाअडका, कपडालत्ता, धान्यधुन्य, मालमसाला, जिन्नसपान्नस, ही सर्व संपति आहे, व हाच संपत्तीचा अर्थ असें व्यावहारिक माणुस उत्तर देईल, परंतु साक्रेतिसानें एके ठिकाणीं म्हटल्यांप्रमाणें हीं सर्व संपत्तीचीं उदाहरणें झालीं. व संपत्ति हजारों वस्तूची झालेली असल्यामुळे आणखीही हजारों वस्तूंचीं नांवें सांगून हा संपत्तीचा अर्थ असें कोणी म्हणल; परंतु आपल्याला शास्त्रीयदृष्ट्या संपत्तीचा अर्थ ठरवावयाचा आहे. म्हणजे संपत्तीची व्याख्या करावयाची आहे, व शास्त्रीय व्याख्या ही गुणवाचक असली पाहिजे हें मागल्या भागांत स्पष्ट करून सांगितलें आहे. ज्या हजारों वस्तू संपत्ति या नांवाखालीं मोडतात, त्या निरनिराळ्या वस्तूंमध्यें असे कोणते सामान्य गुण आहेत कीं ज्यामुळे त्या सर्वांना संपत्ति हें सामान्य नांव मिळतें?
 ज्या ज्या वस्तूला संपत्ति म्हणतात, ती ती वस्तु मनुष्यापासून भिन्न व अलग राहणारी असली पाहिजे. मानवी प्राण्यापासून स्वतंत्र राहण्याची शक्ति हा एक गुण सर्व संपत्तीमध्यें असला पाहिजे. यावरून मनुष्य किंवा त्याचे गुण ही संपत्ति होऊं शकत नाहीं. ज्या ठिकाणीं गुलामगिरी कायदेशीर पद्धति आहे, तेथें एक मनुष्य दुस-या मनुष्याचां संपत्ति होऊं शकेल. परंतु आपली स्वतःची संपत्ति होऊ शकणार नाहीं. तसेच त्याचे गुणही संपत्तींत मोडणार नाहीत. मनुष्याचे गुण हे संपत्तीच्या उत्पत्तीचीं कारणें असूं शकतील. जसें एखादा मनुष्य आपल्या बौद्धिक गुणानें पुष्कळ संपत्ति मिळवील किंवा एखादा आपल्या गाण्याच्या गुणावर श्रीमंत होईल. परंतु हा त्याचा गुण म्हणजे संपत्ति नव्हे. तो संपत्ति उत्पन्न करणारा झरा