पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/493

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[४७७] कंपनीला शेंकडा २०० टक्के सुद्धां फायदा पडत असे. एवढे खरें कीं, त्या काळच्या जलमार्गाच्या व्यापाराला काळ फार लागे. एक सफर पुरी होण्यास दोनपासून तीन वर्षे लागत. तेव्हां त्या मानानें इतका फायदा एक प्रकारें वाजवीच होता. हा व्यापार चालावण्याकरितां ईस्ट इंडिया कंपनीचें मूळचें भांडवल ४२ लक्ष पैोंड होतें. या कंपनीला इंग्रजसरकाराकडून वेळोवेळीं सनदा मिळत व या सनदांची मुदत सरून पुनः कांहीं काळची नवी सनद करून देतेवेळीं इंग्रज सरकार कंपनीकडून सवलतीच्या व्याजानें कर्ज घेई. इंग्लंडचा राजा पहिला जेम्स याचे कारकीर्दीत एक प्रतिस्पर्धी कंपनी निघाली होती. परंतु १७०७ मध्यें दोन्ही कंपन्यांचा मिलाफ होऊन समाईक कंपनीची काम सुरळीत चालूं लागलें. युरोपांतून हिंदुस्थानला गलबतें आल्यावर त्यांचा मालाकरितां केव्हां केव्हां फार खोळबा होऊ लागला, म्हणून इंग्लंडातून दुप्पट रक्कम एक दोन साली पाठविण्याचें ठरले. या व्यापाराकरितां काढावे लागणारे पैसे भांडवलांत धरलें जात असत. परंतु इंग्लंडांतल्या सरकारास देण्याकरितां काढिलेलेपैसे कंपनीच्या पतीवर व मालमत्तेवर काढलेलें कर्ज समजत असत. तसेंच गलवतांची रोटी होऊ नये म्हणून कारागिरांना आगाऊ पैसे देण्याकरितां हिंदुस्थानांतही कर्ज काढण्याची कंपनीच्या एजंटांना परवानगी दिली होती. या दोन प्रकारच्या कंपनीच्या कर्जाला Bond debts म्हणत असत. अशी स्थिति १७३२ पर्यत होती. सन १७३२ पर्यंत कंपनर्नि इंग्रज सरकाराला ३२ लक्ष पौंडांचें कर्ज दिले होते. या साली आणखी एका नव्या कंपनीला सनद देण्याचा बूट मंत्रिमंडळात निघाला. मांत्रिमंडळाची समजावणी करण्याकरितां कंपनीने २ लक्ष पौंड सरकारला देण्याचें कबूल केलें. पुढें १७४४ मध्यें आणखी ३६वर्षे मुदतीची सनद वाढून घेण्याकरिता सरकारास शेंकडा तीन टक्के व्याजानें १०लक्ष पौड देऊ केले व हे पैसे कंपनीने आपल्या पतीवर उभारलं. याप्रमाणे कांहीं व्यापाराकरितां, कांहीं इंग्लंडांत इंग्रज सरकारला देण्याकरितां व कांहीं हिंदुस्थानांत माल वगैरेच्या खरेदीकरितां कर्ज कंपनी आपल्या पतीवर काढीत असे. परंतु १७५७ सालीं प्लासीची लढाई झाली व पुढें लवकरच बंगाल, बहार व ओरिसा या प्रांतांची दिवाणी कंपनीला मिळाली तेव्हांपासून ईस्ट इंडिया कंपनी ही हिंदुस्थानांत सरकार बनली व तिला राजकीय महत्व आलें. आधींच इंग्लंडच्या लोकांचा हिंदुस्थानच्या संपन्नतेबद्दल