पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/492

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ४७६] प्राप्त होण्याकरितां हिंदुस्थान देश हा देवी संकल्पिताप्रमाणें सुधारलेल्या एकछत्री नियंत्रित राज्यपद्धतीकडे येणें अवश्य होतें व हें संकल्पित घडवून आणण्याकरितां परमेश्वरानें मनुष्याच्या स्वार्थी मनोवृत्तीचाच उपयोग करून येथं ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करवििली व तिच्या स्वार्थी डायरेक्टरांच्या हृस्तें ब्रिटिश साम्राज्याचा प्रचंड वृक्ष येथें रुजविला व तो वाढवून शेवटी १८५७ सालच्या बंडानंतर तो खुद्द ब्रिटिश पार्लमेंटाचे हातीं देवविला. या इतिहासापासून बोध घेण्यासारखा आहे असें सांगून आतां त्या इतिहासाचा थोडक्यांत विचार करूं. या कजच्यिा उत्पत्तीची बरोबर कल्पना येण्याकरितां ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापाराचें सामान्य स्वरूप लक्षांत आलें पाहिजे; कारण त्या काळीं इंग्लंड देशाचा हिंदुस्थान देशाशीं कशा प्रकारचा व्यापार होता, याची कल्पना हल्लींच्या व्यापारावरुन मुळींच करतां येण्यासारखी नाही. कारण त्या काळीं हिंदुस्थान देश हा कलाकौशल्याच्या कामांत फार पुढे होता, व युरोप हे या कामांत अगदीं रानटी स्थितीत होतें. तेव्हां युरोपांतून कांहीं माल आणून तो हिंदुस्थानांत खपवून त्यावर लाखों रुपयांचा फायदा जसे हल्लीचे व्यापारी मिळवितात, तसा प्रकार ईस्ट इंडिया कंपनीचे वेळीं नव्हता. कांहीं बारीकसारीक चमत्कारिक स्वभावजन्य वस्तूंखेरीज तिकडून हिंदुस्थान देशांत आणण्यासारखे कांहीं नव्हतें. अमेरिकेंत सोन्यारुप्याच्या खाणी सांपडल्यामुळे युरोपांत सोन्यारुप्याचा ओघ सुरू झाला; हे सोनूरुपें गलबतांत भरून ईस्ट इंड़िया कंपनीचे नोकर हिंदुस्थानांत आणीत, व हे पैसे येथल्या कारागिरांना आगाऊ देऊन त्यांचेकडून सुती, लोोकरी व रेशमी तलम कापड करवून घेत. तसेंच हस्तिदंती व लांकडी हस्तकौशल्याचें काम, सोरा, मसाल्याचे पदार्थ, चहा, कॉफी वगैरे पदार्थ विकत घेत. सारांश, युरोपांत ज्या ज्या मालाचा खप असतो, तो माल ते येथून गलबतांत भरून नेत व युरोपामध्यें विकीत. हा कंपनीचा व्यापार फार फायद्याचा असे. कारण हा सर्व माल युरोपांत फारच महाग असे. याचें कारण जलमार्गाचा शोध लागण्यापूर्वी फार खर्चाच्या, धोक्याच्या व त्रासाच्या खुष्कीच्या मार्गानें हिंदुस्थान व युरोप यांमधला व्यापार चालत असे; परंतु जलमार्ग निघाल्यामुळे फार कमी खर्चानें हा माल युरोपात जाऊन पोहचे व त्या वेळीं व्यापारांत चढाओढ नसल्यामुळे ईस्ट इंडिया