पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/491

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[४७५] सर्व रहििवाशी हे जित आहेत असें समजलें जातें. परंतु हिंदुस्थानच्या कर्जाच्या इतिहासाकडे लक्ष दिलें असतां हिंदुस्थानवासीयांनीं आपण होऊन आपल्याला जिंकून घेतलें असें म्हणणें रास्त होईल असें स्पष्ट होतें. कारण या राज्यस्थापनेचा पेनपैचा खर्च हिंदुस्थाननेे दिला आहे व असें असूनही हिंदुस्थानवासी लोक त्या कर्जाचें व्याज भरीत आहेत, पाश्चात्य सुधारणाची व प्रगतीची जोड पौर्वात्य संस्कृतीस दिल्यानेे भविष्यकाळीं हिंदुस्थानची उन्नति स्पृहणीय होईल व त्याकरितां प्रस्तुतची किंमत देण्यांत आली आहे. गुरुगृहीं वास म्हणजे परवशता नसून भावी सुखाची पूर्व तयारी आहे. असें मानून विटिश साम्राज्याबद्दल स्वाभिमानपूर्वक बोलण्यास प्रत्यवाय नाहीं. ईस्ट इंडिया कंपनी हें हिंदुस्थानवासीयांनीं आपल्या देशाला एकदांची सुधारलेली कायद्याची राज्यव्यवस्था मिळकून देण्याकरिितां, भाड्याने वेतलेलें एक यंत्रच होतें असें मानतां येईल. कारण या राज्यव्यवस्थेनेंच हिंदुस्थानचें खंडत्व जाऊन त्याला एकराष्ट्रीयत्व येत चाललें आहे. पाश्चात्थ शिक्षण, पाश्चात्य कायदा, पाश्चात्य दळणवळणाचीं साधनें, पाश्चात्य सुव्यवस्थित व नियंत्रित राज्यव्यवस्था, हीं कंपनी सरकारचें हिंदुस्थानांत राज्य झालें म्हणून इकडे आलीं व त्या गोष्टीच हिंदुस्थानवासीयांचें एकराष्ट्र बनविण्यास कारणीभूत होत आहेत. तेव्हां ही राज्यपद्धति हिंदुस्थानवासीयांनीं आपल्या खर्चानें विकत घेतली असें म्हणणे हिंदुस्थानच्या कर्जाच्या इतिहासाकडे लक्ष देतां वस्तुस्थितीस धरून असून अन्वर्थकही आहे. हे खरें आहे की, ही राज्यस्थापना निर्माण होत असतांना इंग्रजी व हिंदी या दोघांनाही या कल्पना नव्हत्या. एकामध्यें स्वार्थ, आपमतलब, व दुसरीकडे मत्सर, द्वेष इत्यादि मनोविकार होते . परंतु यालाच कै. न्यायमूर्ति रानडे दैवी संकल्पित म्ह्णत व हिंदुस्थानावरील ब्रिटीश साम्राज्य हे मानवी संकल्पित नाही तर दैवी संकल्पित आहे असे ते म्हणत असत. त्याचा अर्थ हाच कीं, जरी मानवी दृष्टीनें हिंदुस्थानांतील ब्रिटिश साम्राज्य हें स्वार्थबुद्धीनें निर्माण झालें असलें तरी ही स्वार्थबुद्धीच परमेश्वरानें, आपले संकल्पित हेतू तडीस नेण्याकरितां साधनीभूत केली. हिंदुस्थानचें हित होण्याकरितां, त्या देशांतील निरनिराळ्या जातींचा कायमचा मिलाफ होण्याकरितां, सारांश, त्या देशाला पूर्ण एकराष्ट्रत्व येऊन त्याला त्याचें पूर्ववैभव