पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/49

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


[३७]

}

सिद्ध शास्त्र आहे असें ठरविण्याचा प्रयत्न केला. अर्थशास्त्र हें समाज शास्त्राचा पोटभेद आहे व समाजशास्त्र हें अनुभवसिद्धशास्त्र आहे. त्याअर्थी अर्थशास्त्रही अनुभवसिद्धशास्त्र आहे हें उघड होतें. परंतु या शास्त्रामध्यें तर्कानें कोणती गोष्ट सिद्ध होत नाहीं किंवा करीत नाहीं असें मात्र नाहीं. या शास्त्राच्या कांहीं कांहीं भागांत तर्कपद्धतीचा अवलंब करणें सोयीचें असतें; तर कांहीं भागांत अनुभव किंवा प्रयोगपद्धतीचा अवलंब करणें इष्ट असतें. अर्थशास्त्राचा जनक अॅडम स्मिथ यानें आपल्या प्रख्यात ग्रंथांत दोन्हीही पद्धतींचा लागेल तसतसा उपयोग केला आहे; व हेंच करणें सयुक्तिक आहे. अॅडम स्मिथ याच्या पुढील जे ग्रंथकार झाले त्यांनीं मात्र अनुभवपद्धति पुष्कळ ठिकाणीं टाकून दिली व रिकार्डो यानें तर या शास्त्राला गणितशास्त्रासारखे तार्किक स्वरूप दिलें. रिकार्डोच्या या करण्यानें तर या शास्त्राबद्दल बराच गैरसमज उत्पन्न झाला. तेव्हां या वादांतलें तथ्य म्हणजे अर्थशास्त्र हें प्राधान्येंकरून अनुभवसिद्ध शास्त्र आहे, परंतु त्याच्या पुष्कळ भागांत तर्कपद्धतीचाही उपयोग होतो. म्हणून या शास्त्राच्या दोन्हीही पद्धति आहेत असें म्हटलें पाहिजे.