पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/489

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[४७३] पाहिलें जातें, तसेंच पूर्वींची ग्यारंटीची पद्धति काढून टाकल्यामुळें कंपन्यांना रेल्वेच्या बांधकामावर अद्वातद्वा पैसा खर्च करण्याचा मोह उत्पन्न होण्याचें कारण राहिलें नाहीं. तसेंच फीडर लाईन्सकरितां देशांतैील कंपन्यांना विशेष सवलती देण्याचा उपक्रमही सरकारनें आतां सुरू केला आहे. १९०९ पर्यंत एकंदर रेल्वेविस्तार किती झाला आहे व त्यावर एकंदर किती खर्च झाला आहे हें खालील आंकड्यांवरून दिसून येईल. मैल. खर्च रुपये. खुद्द सरकारी लाईनी २३.६३३ ३,७१,१२,५२,००० नव्या गॅरंटी कंपनीच्या लाईनी ३२ २९,४४,००० डिस्ट्रिक्ट बोडच्या लाईनी १५२ ६८,०९,००० बँच लाईनी ९०१ ५,२२,६१,००० सरकारनें मदत दिलेल्या कंपन्यांच्या लाई. ३६६ २,९६,८६,००० प्रांतिक सरकारनें मदत केलेल्या कंप. लाई. १२८ १,३०,७१,००० डिस्ट्रिक्ट बोर्डानीं मदत केलेल्या " " १६५ ८०,१०,००० सरकारपासून फक्त जमीन मोफत घेतलेल्या १,३८३ १०,१२,१५,००० अगदीं स्वतंत्र लाईनी ४२ २७,८७,०० करारानें घेतलेल्या लाईनी ७९ १,१९,७७,००० संस्थानांच्या लाइनी ३,६२१ २१,५७,२२,००० परकी सरकारच्या लाईनी ७४ १,८६,६४,०००

सुमारें पौंड                      ४,१७,५०,१८,००० रुपये २८,६३,५५,०००

आतां पाटबंधाऱ्यांचा १९०९ सालपर्यंतचा विस्तार व त्यावर झालेल्या खर्चाकडे पाहू.

                त्याखालीं भिजलेली जमीन एकर.                खर्च.          
मोठे पाटबंधारे          १,४८,७४,०२९                      २,२१,४३,२८८ पेोंड.  लहान कामें          ७१,७४,०४२                             ४१,२८,२९४ पेौंड.

हिंदुस्थानच्या अनुत्पादक कर्जाचा इतिहास फार विलक्षण व मोठा विस्मयजनक पण एका दृष्टीनें बोधप्रद आहे. हिंदुस्थान सरकार ही प्रचंड संस्था निर्माण होण्याच्या पूर्वींपासून हिंदुस्थानचें हल्लींचें कर्ज चालत आलेलें आहे; इतकेंच नव्हे, तर ज्या काळी अशी मोठी राज्यपद्धति पुढें थोड्याच काळांत निर्माण होणार आहे अशी कल्पनासुद्धां