पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/468

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 माल दुस-या देशांतून घेऊं लागतील व असें झालें म्हणजे या देशाच्या मालाचें गि-हाईक कमी होईल. म्हणजे हा माल स्वस्त होईल. अर्थात हा कर देशांतल्या कारखानदारांना द्यावा लागेल किंवा हे कारखाने देशांतून अजीबाद नाहींसे होतील. परंतु निर्यात मालाचा त्या देशाला पूर्ण मक्का असला व हा माल आयात करणा-या देशाची मागणी लवचिक नसून ती दुस-या त-हेनें भागविण्यासारखी नसली तर ही मालाची वाढलेली किंमत प्रदेशाचा माल वापरणारांवरच पडेल. परंतु निर्यात जकातीच्या योगानें देशांतील धंद्याला धक्का बसण्याचा पुष्कळ संभव आहे. यामुळे निर्यात जकाती परकी देशांवर पडतात असें समजणें चुकीचें आहे. वरील उदाहरणावरून कराचा संपात शोधून काढणें हें बरेंच कठिण असतें हें दिसून येईल. व अमुक कराचा संपात काय आहे या प्रश्नाचे उत्तर तात्विक तन्हनें देतां येणार नाहीं. हें देण्याकरितां त्या कराबद्दल व त्या देशाबद्दल विशिष्ट माहिती अवगत पाहिजे तरच अशा प्रक्षाला उत्तर देतां येईल. येथें सरकारच्या उत्पन्नाच्या बाबींचा तात्विक विचार आटपला. ‘ आतां सरकारला प्रसंगीं जो खर्च लागतो तो अर्वाचीन काळीं राष्ट्रीय कर्जानें भागवितात. तेव्हां आतां राष्ट्रीय कर्जाची मीमांसा काय आहे हे पाहिलें पाहिजे.