पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/467

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[४५१] करांपैकींच आहेत व कराच्या संपाताच्या दृष्टीनें त्याचा संपात निश्चित असतो. तो दुस-यावर ढकलतां येत नाहीं. परंतु हे कर कराच्या बाकीच्या तत्त्वाविरुद्ध आहेत. हे कर प्रजेला फार त्रासदायक आहेत. शिवाय हे कर वसूल करण्यास खर्चही जास्त लागतो. यामुळे सुधारलेल्या देशांतून असे कर दृष्टोत्पत्तीस येत नाहींत. अप्रत्यक्ष करापैकीं विचार करण्यासारखे प्रकार म्हणजे आयात जकात, निर्यात जकात व अन्तर्जकात.हे तिन्ही कर व्यापारी लोक प्रथमतः देतात खरे, तरी पण ते शेवटीं ती माल खरेदी करणारांवरच पडण्याच्या हेतूनें बसविलेले असतात व सामान्यतः हें खरंही आहे. परंतु केव्हां केव्हां त्याचा दुसराच अनपेक्षित परिणाम घडतो. उदाहरणार्थ, एका आयात मालावर नवा कर बसविला; तर व्यापारी तितक्या मानानें त्या मालाची किंमत वाढवितील व जर तो माल आयुष्याच्या अवश्यकांपैकीं असेल व त्याची मागणी कमी होण्यासारखी नसेल तर हा कर हा माल वापरणारांवर पडेल हें उघड आहे व सामान्यतः आयात जकाती या देशांतील माल वापरणारांवरच पडतात. परंतु मालाची किंमत वाढली म्हणजे त्याची मागणी कमी होते व यामुळे अशा करानें देशांत माल कमी येऊ लागेल किंवा परदेशांतील कारखानदारांना तो स्वस्त करावा लागेल. परंतु परदेशचे व्यापारा प्रथमत: ज्या ठिकाणी अशी आयात जकात नसेल तेथे आपला माल पाठवू लागतील व त्यांना असा खुला बाजार मोकळा नसल्यास आपल्या नफ्यांत कमी करून माल थोडा स्वस्त करतील. अशा वेळीं कराचा थोडा अंश परकी व्यापारी देईल; परंतु मुख्यत्वेंकरून आयात जकातीचा संपात देशांतील गिऱ्हाइकांवरच पडतो असें म्हणण्यास हरकत नाही. व सुधारलेल्या देशात कराचा महत्वाचा भाग अशा जकातीपासूनच उत्पन्न केला जातो. आतां निर्यात जकाती व्या. एखाद्या बाहेर देशीं जाणा-या मालावर जकात बसविली आहे असें समजा. आतां ज्याप्रमाणें निर्यात जकात परदेशी ता माल वापरणारांवर पडते, त्याप्रमाणें निर्यात जकात परदेशी ता माल वापरणारांवर पडते असें सामान्यत: समजलें जातें. परंतु असा परिणाम खात्रीनेच होईल असें मात्र म्हणतां येत नाहीं. व्यापा-या , कडून ही जकात घेतली म्हणजे ते लोक त्या मालाची किंमत त्या मानानें वाढवितील. परंतु दुस-या दुशांतील लोक या देशाचा माल न घेता तसला