पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/465

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत


[४४९] रास्त होईल. परंतु निरनिराळ्या करांच्या या विशिष्ट विचारांस लागण्यापूर्वी एक सामान्य गोष्ट येथें सांगितली पाहिजे. ती ही कीं, ज्या देशांत संपत्तीची वाटणी रूढीनें व कायद्यानें ठरलेली असते त्या देशांत कराचा संपात फारसा बदलत नाहीं. तो बहुधा कर देणारावर पडती. परंतु जेथे संपत्तीची वांटणी पूर्ण चढाओढीनें ठरते तेथें कराच्या संपाताचा प्रश्न बिकट होतो. कारण कर बसवितांना कायद्याचा उद्देश कांहींही असला तरी चढाओढीच्या अंमलांत तो हेतु बाजूसच राहून प्रत्यक्ष कराला अप्रत्यक्ष कराचें रूप येतें तर अप्रत्यक्ष कराला प्रत्यक्ष कराचें रूप येतें. व ज्याप्रमाणें अर्वाचीन काळीं मजुरी, नफा, व्याज व पदार्थांच्या

किंमती यांच्या भावाच्या मूळाशीं कोणत्याना कोणत्या रूपांत मागणी व पुरवठा यांच्या नियमांचा संबंध येतो व या नियमानुरूप हे भाव ठरतात त्यांचप्रमाणें कराच्या संपाताची गोष्ट आहे. ती ही की संपात कांहीं एका स्वरूपाच्या मागणी व पुरवठा यांच्या नियमावर अवलंबून असतो.हे पुढील उदाहरणावरुन सहज ध्यानात येईल.

जमिनीवरील कर हे प्रत्यक्ष करापैकीं आहेत व सामान्यतः हे कर जमीनदारावर पडतात.परंतु केव्हां केव्हां हे करही दुसऱ्यावर टाकले जातात. जमिनीवरील करांचे दोन भेद होतात. एक शेतकीच्या कामाला लाविलेल्या जमिनीवरील कर व एक घरें बांधावयाच्या कामांत लावविलेल्या जमिनीवरील कर. याच्याच जातीचा तिसरा कर म्हणजे का होय. आता हे तिन्ही कर सामान्यतः जमिनीच्या व घराच्या मालकावर पडावे अशी कायदे करणारांची इच्छा असते; परंतु सर्वत्र असाच या कराचा संपात होईल असे मात्र नाही. समजा एका ठिकाणी जमिनीवर एक नवा कर बसविला किंवा पूर्वीचा कर वाढविला तर तो कर जमीनदार लोक देतील परंतु ज्या ठिकाणी जमीनधाऱ्यांची पद्धती कायमची ठरलेली नाही तेथे जमीनदार लोक आपल्या उपरी कुळांकडून जास्त भाडे घेण्य प्रयत्न करतील व तेथलीं कुळे आयरिश कुळांप्रमाणे अनन्यगतिकअसली व त्यांची जमीन लागवडीस मिळवण्याबद्दल फार चढाओढ असली तर हा जादा कर उपरी कुळांवरच पडेल. परंतु कसणारे शेतकरी बऱ्यास्थितीत असले व जमीनदारवर्गही मोठा असला तर त्यांना आपली भाडी वाढविता येणार नाहींत. कारण भाडी वाढविल्यास शेतकरी शेते कसण्यास