पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/461

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

22. तत्व सुराज्यव्यवस्थेच्या दृष्टीनें चांगलें आहे, इतकेंच नाहीं तर अशा रीतीनें बसविलेल्या करापासून उत्पन्नही जास्त होतें. या तत्वानुरूप अप्रत्यक्ष कर प्रत्यक्ष करापेक्षां सोईस्कर असें ठरतें व म्हणून सुधारलेल्या सरकारचा या कराकडे जास्त ओढा दिसून येतो. कारण अप्रत्यक्ष कर मनुष्याला फार सोईस्कर असतात. कारण हा कर एकदम एकरक्कमी द्यावा लागत नाहीं, तर तो अगर्दी बारिक बारिक हप्त्यांनीं व पदार्थाच्या किंमतीच्या अंशभूत रीतीनें न कळत दिला जातो व अशी कर भरण्याची रीत सोईच्या तत्वास अनुसरून आहे हे उघड आहे. कराचें चवथें तत्व-कराची काटकसर-प्रत्येक करांची अशी योजना पाहिजे कीं, त्यापासून लोकांच्या ख्रिशांतून बाहेर जाणारी रक्कम व सरकारच्या तिजोरींत येणारी रक्कम यांमध्यें होतां होईल तितकें कमी अंतर असावें. अर्थात कर वसूल करण्याचा खर्च होतां होईल तितका काटकसरीनें व्हावा. कारण कराचा उद्देश सरकारला उत्पन्न मिळविण्याचा असतो. आतां एखादा कर वसूल करण्यास जर फार खर्च लागला तर लोकांच्या ख्रिशांतून पुष्कळपैसे जाऊन त्या मानानें सरकारच्या तिजोरींत फार रक्कम येत नाहीं. कांहीं कर या फार खर्चाच्या मुद्यावर वाईट ठरतात. उदाहरणार्थ, पायगाडीवरील कर हा वसूल करण्यास फार खर्च लागेल व त्या मानानें त्याचें उत्पन्न होणार नाहीं, या मुद्यावर नुकताच मुंबईम्युनिसिपालीटीनें हा कमी केला. वरील कराचीं चार तत्वें अॅडम स्मिथचीं कराचीं तत्वें या नांवानें प्रसिद्ध आहेत. पुढील अर्थशास्त्रकारांनीं आणखीं कांहीं किरकोळ तत्वें सांगितलीं आहेत. त्यांचाही संग्रह येथें करणें वाजवी आहे. यापैकीं कांहीं तत्वें हीं वरच्या तत्वांपासून निष्पन्न होतात असें म्हणण्यास हरकत नाहीं. सरकाराला लागणा-या एकंदर उत्पन्नाची रक्कम भाराभर अनुत्पादक बारिक बारिक करांपासून काढण्यांपेक्षां थोड्याशा उत्पादक मोठ्या करांपासून काढणें चांगलं,हे तत्व काटकसरीच्या तत्वाचेंच पर्यायभूत तत्व आहे. कारण या योगानं करवसुलीचा खर्च पुष्कळच कमी होतो. १८४६ सालापूर्वी इंग्लंडातील आयात जकाती किती तरी भानगडीच्था व किती तरी पदार्थावर होत्या.परंतु कराच्या व जकातीच्या पद्धतीतील हा गोंधळ, घोटाळा