पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/458

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ४४२] मत्तेच्या व्यवस्थेसारखा आहे.त्या मालमत्तेमध्यें ज्याचा जितका हितसंबंध आहे त्यानें तितक्यापुरता खर्च देणें अवश्य आहे. त्याचप्रमाणें एखाद्या सरकारच्या प्रजाजनांनींही करणें आवश्यक आहे, व कराचें हें तत्व पाळलें नाहीं म्ह्णजे करामध्यें असमता आली असें ह्मणतां येईल व हें तत्व पाळलें गेलें म्हणजे करामध्यें समता राहिली असें ह्मणतां येईल." अॅडाम स्मिथनें प्रतिपादन केलेल्या कराच्या पहिल्या तत्वाचा हा केन्द्रीभूत भाग आहे.

    परंतु आतां वादग्रस्त प्रश्न असा आहे कीं, समता कशावरून मोजावयाची व यासंबंधानें अर्वाचीन काळीं तीन मीमांसा पुढें आलेल्या आहेत. कराची त्यागमीमांसा; कराची सामथ्र्य-मीमांसा व कराची लाभ-मीमांसा.                                                
    कराची त्यागमीमांसा-प्रत्येक मनुष्य सरकारला कर देतो यामध्यें तो कांहीं आत्मत्याग करीत असतो. तेव्हां हा त्याग सर्वांचा सारखा झाला पाहिजे म्हणजे करामध्यें समता आली असें म्हणतां येईल. श्रीमंत माणसारनें कांहींएक रक्कम सरकारला देण्यामध्यें त्याचा जितका आत्मत्याग होतो त्यापेक्षां किती तरी पटीनें जास्त त्याग गरीब मनुष्यास तितकीच रक्कम द्यावी लागल्यास करावा लागतो. म्हणून कर हा उत्पन्नाच्या मानानें वाढता पाहिजे, इतकेंच नाहीं तर मनुष्याच्या आवश्यकांना लागणारें उत्पन्न कराच्या मर्यादेंतून काढून टाकलें पाहिजे. याच मुद्यावर बहुतेक सर्व ठिकाणीं प्राप्तीवरील कर बसविण्याची मर्यादा असते म्हणजे

त्या मर्याडदेखालील प्राप्तीवर कर ठेवीत नाहींत. तसेंच हा प्राप्तीचा कर वाढता असतो.याच मुद्यावर सुधारलेल्या देशांत आयुष्यांतील आवश्यकांवर कर बसविणें गैर मानतात. कारण आयुष्याचीं आवश्यकें हीं गरिबांना व श्रीमंतांना सारखींच लागतात. परंतु यामुळें गरीब व श्रीमंत हे कर सारखाच देतात. अर्थात अशा कराच्या पद्धतींत गरीबश्रीमंतांचा आत्मत्याग सारखा राहत नाहीं. परंतु कोणत्या कारानें कोणत्या व्यक्तीचा किती आत्मत्याग होतो हें समजणें फार कठीण आहे. कारण आत्मत्याग ही मानसिक गोष्ट आहे. यामुळें जरी या मीमांसेमध्यें तथ्यांश असला तरी तिचा पूणविलंब शक्य नसतो.

    कराची सामर्थ्य-मीमांसा-यामध्यें मनुष्याच्या उत्पन्नावरून त्याची ऐपत ठरविली जाते. अॅडाम स्मिथनें समता तत्वाचा हाच स्वभा-