पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[३३]

 दुसरी अंगे आहेत, तीं या व्याख्येने वगळली जातात; तेव्हां, ही व्याख्या सदोष म्हणूनच टाकाऊ आहे
{{gap}]अर्थशास्त्राची दुसरी एक व्याख्या केली जाते, याव्याख्येप्रमाणे अर्थशास्त्र हे एक नीतिशास्त्राचा भाग गणिलें असून तें मानवी कल्याणाच्या आधिभौतिक साधनांच्या सिद्धीबद्दलच्या व्यक्तीच्या व समाजाच्या कृत्यांचा विचार करतें असे म्हटले आहे. परंतु ही व्याख्या इतकी व्यापक आहे कीं, तिच्यावर अतिव्याप्तीचा दोष येतो. म्हणजे ही व्याख्या फारच विस्तृत आहे. कारण या व्याख्येच्या योगाने नीतिशास्त्र, आरोग्यशास्त्र वगैरे सर्व शास्त्रांचा या शास्त्रात अंतर्भाव होऊ लागेल. वरील दोन्ही व्याख्येतील दोष परस्पर विरोधी परंतु अगदीं उघड व स्पष्ट आहेत. यामुळे या दोन व्याख्या एखाद दुसऱ्याच ग्रंथकारानें ग्राह्य धरलेल्या दिसून येतात. सामान्यतः अर्थशास्त्रज्ञ किंवा इतर लोक यांना या दोन्ही व्याख्या पसंत नाहीत असे दिसते. परंतु या पुढे विचार करावयाची व्याख्या मात्र पुष्कळ ग्रंथांत दिलेली आढळून येते. ती व्याख्या ही. संपत्तीची उत्पाति, वांटणी व अदलाबदल यांचा ऊहापोह करणारे शास्त्र तें अर्थशास्त्र होय.,
 या व्याख्येमध्ये अर्थशास्त्राच्या तीन अंगांचा प्राधान्यकरून उल्लेख आलेला आहे. परंतु अर्थशास्त्रावरील बहुतेक ग्रंथांत सरकारच्या कराचीं तत्वें दिलेली असतात. तेव्हां हेही एक अर्थशास्त्राचे अंग आहे. व या दृष्टीने या अंगाच व्याख्येंत अंतर्भाव झाला पाहिजे असे म्हणावे लागते तसेच कांही ग्रंथकार व्यय किंवा उपभोग म्हणून अर्थशास्त्राचे आणखी एक अंग कल्पितात; तेव्हा याचाही उल्लेख व्याख्येत आला पाहिजे. याप्रमाणे अर्थशास्त्रांतील विषयाच्या वाढीबरोबर अर्थशास्त्राच्या व्याख्येत नवीन नवीन अंगाचा अन्तर्भाव करवा लागेल. परंतु वरच्या व्याख्येत स्वीकारलेली व्याख्या करण्याची पद्धति योग्य नाही. कारण कोणत्याही पधार्ताची व्याख्य
आपण त्यांत अंतर्भूत होणाया अंगावरून किंवा अवयवावरून करीत नाही. तर्कशास्त्रामध्ये ज्याला गुणागम म्हणतात त्यावरुन वस्तूच्या व्याख्या किंवा लक्षण करणें हीच खरी शास्त्रीय पद्धति आहे. वस्तूच्या संख्यागमावरून किंवा त्यांतील अवयवावरून व्याख्या करणे गैर आहे. अर्थशास्त्राच्या वर दिलेल्या व्याख्येत हा मोठा दोष आहे.अर्थशास्त्राची अमुक अमुक अंगे आहेत असे सांगणे म्हणजे त्या शास्त्राची व्याख्या करणें नव्हें; तर ते • •