पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/439

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ४२३ ] खेळ लोक खेळतात. यामुळे या अवस्थांमध्यें निराळे लष्करी शिक्षण देण्याचें प्रयोजन नसतें. अगदीं अलीकडेसुद्धां या म्हणण्याचें प्रत्यंतर दिसून येतें. गेल्या बोअर युद्धांत बोअर लोकांनीं इतका विलक्षण पराक्रम गाजविण्याचें कारण त्यांचें विशेष लष्करी शिक्षण हें नव्हे. बोअर लोक हे बहुतेक शतकरी होते व उत्तम नेम मारणें हें त्यांचा हातखंडा काम होतें. यामुळे प्रत्येक बोअर हा इंग्रजांच्या कसलेल्या शिपायांपेक्षां जास्त चांगला शिपाई बनला व कित्येक दिवसापर्यंत बोअर शेतकऱ्यांनीं इंग्रजांच्या कसलेल्या सैन्याला दाद दिली नाही. परंतु उद्योगवृत्ति समाजांत लोकांना फुरसत नसते. त्यांचा सर्व वेळ शांततामय अशा उद्योगांत जातो व म्हणून या अवस्थेंत समाजाच्या संरक्षणाचें काम कठिणही होतें व तें खर्चाचेंही होतें. कारण आतां संरक्षणासाठीं स्वतंत्र सैन्य ठेवावें लागतें. या सैन्याचे प्रकार दोन आहेत. एक नागरिक सैन्य व दुसरें भाडोत्री सैन्य. सरकार कायद्यानें आपल्या स्वतःच्या धंद्याखेरीज जेव्हां सर्व नागरिकांना किंवा नागरिकांच्या कांहीं संख्येला शिपायाचा धंदा पतकरण्यास व लष्करी शिक्षण घेण्यास भाग पाडतें तेव्हां ती नागरिक सैन्यपद्धति होय. तिलाच हल्लीं सक्तीची लष्करी शिक्षणपद्धति म्हणतात. ही पद्धति फ्रान्स जर्मनी वगैरे युरोपियन देशांत आहे. इंग्लंडमध्यें ठेविलेल्या सैन्याखेरीज व्हॉलन्टिअरची पद्धति आहे. ठेविलेल्या सैन्यपद्धतीत सरकारला शांततेत व लढाईच्या वेळी सैन्यांतील शिपायांना पगार द्यावा लागतो. सारांश, या पद्धतींत शिपायाचा धंदा इतर धंद्यांहून भिन्न असा एक स्वतंत्र धंदा होतो. नागरिक पद्धतींत सरकारला शांततेच्या वेळीं नागरिकांना पैसे द्यावे लागत नाहींत. नागरिक आपआपले नेहमीचे धंदे करतात व आठवड्यांतून एक दोन दिवस लष्करी शिक्षणाला देंतात. जेव्हां सैन्य प्रत्यक्ष लढाईवर जातें तेव्हांच शिपायांना पगार देतात. परंतु भाडोत्री सैन्यपद्धतींत शिपाई नेहमी कवाईत करीत असतात. यामुळें त्यांना नेहमीच पगार द्यावां लागतो. म्हणून असें सैन्य ठेवणें हें फार खर्चाचें काम असतें. नागरिक पद्धतींत लोक आपले लष्करी व्यायाम मोठ्या कंपूत किंवा लहान कंपूत करतात. म्हणजे नागरिकांच्या सैन्यांतील टोळ्यांप्रमाणे टोळ्या केलेल्या असतात व नेमलेल्या कामदारांच्या देखरेखीखाली लष्करी कवाइत करतात किंवा आपण