पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/431

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अर्थशास्त्राचीं मूलतत्वें.


पुस्तक ५ वें. राष्ट्रीय जमाखर्च. भाग पहिला. सामान्य वेिचार. तात्विक अर्थशास्त्राचें हें शेवटलें पुस्तक आहे. प्रास्ताविक पुस्तकांत निर्दिष्ट केल्याप्रमाणें या पुस्तकांत देशांतील सरकारच्या जमाखर्चाचा विचार करावयाचा आहे. म्हणजे सुधारलेल्या राष्ट्रांतील सरकारच्या खर्चाच्या मुख्य बाबी कोणत्या असतात व राष्ट्रीय खर्च भागविण्याकरितां सरकारला कोणकोणत्या बाबींतून उत्पन्न काढावें लागतें, याच्या उत्पन्नाचे प्रकार कोणते; कराचीं तत्वें काय; या करांचा बोजा देशांतील निरनिराळ्या वर्गांवर कसा पडतो; व त्याचा देशाच्या सांपत्तिक स्थितीवर काय परिणाम होतो; राष्ट्रीय कर्ज म्हणजे काय व ते कशाकरितां काढावें लागतें व त्याचाही देशांतील सांपात्तिक स्थितीवर काय परिणाम होतो वगैरे विषयांची या पुस्तकांत चर्चा करावयाची आहे. या पुस्तकाच्या विषयाचा अर्थशास्त्रामध्यें अन्तर्भाव करावा किंवा नाहीं याबद्दल अर्थशास्त्रकारांमध्यें अलीकडे मतभेद होत चालला आहे. कांहीं अर्थशास्त्रकार सरकारचीं कर्तव्यकर्में व सरकारी खर्चाच्या बाबी यांचा ऊहापोह करीत नाहींत; कारण त्यांचे मतानें हा राजनीतिशास्त्रांतला विषय आहे व ते फक्त कराचीं प्रसिद्ध तत्वें व करांचा संपत्तीच्या वांटणीवर परिणाम