पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/417

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[४०३] मध्यें असतें. यामुळें कायद्यानें एका पैोंडाची किंमत २५.२२ फ्रँकांबरोबर झाली. यालाच कायदेशीर अगर टांकसाळी हुंडणावळीचा भाव ह्मणतात. हा अगदीं कायमचा व ठरीव आहे. जोंपर्यंत इंग्लंड व फ्रान्स या देशांतील टांकसाळीचे कायदे कायम आहेत तोंपर्यंत हा भाव कायम राहणार व प्रत्यक्ष व्यापारांतील हुंडणावळीची तुलना या स्थिर भावाबरोबर केली जाते. याप्रमाणें सोनें ही कायदेशीर चलनाची धातु असणा-या देशामध्यें कायमचा व ठरीव असा एक हुंडणावळीचा भाव असतो. परंतु कायदेशीर फेडीच्या निरानराळ्या धातू असलेल्या देशामध्यें असा हुंडणावळीचा भाव शक्यच नाहीं. उदाहरणार्थ, इंग्लंड व चीन या देशांमध्यें कायमचा असा हुंडणावळीचा भाव शक्यच नाहीं, कारण एका देशांत सोनें ही चलनाची धातु आहे तर दुस-यांत रुपें ही चलनाची धातु आहे. परंतु या दोन धातूंचा परस्पर भाव इतर मालाप्रमाणें नेहमीं कमी जास्त होतो व या दोन देशांतील हुंडणावळ या बाजारभावावर अवलंबून असते. १८९३ पूर्वी हिंदुस्थान व इंग्लंड यांमधील व्यापाराची हीच स्थिति होती ह्मणजे या ठिकाणीं कायदेशीर असा हुंडणावळीचा भाव नव्हता. परंतु आतां हिंदुस्थान व इंग्लंड यांच्या चलनी नाण्यामध्यें कायदेशीर व ठरीव असा हुंडणावळीचा भाव आहे, तो भाव ह्मणजे कायद्यानें ठरविलेलें पौंड व रुपये यांचें प्रमाण होय. तेव्हां हा कायदा अंमलांत आहे तोंपर्यंत १५ रुपयांस एक पौंड हा कायदेशीर हुंडणावळीचा भाव होय. आतां या हुंडणावळीच्या भावांत कमी जास्तपणा कसा होतो तें पाहूं. समजा कीं, फ्रान्समधून इंग्लंडमध्यें नेहमीपेक्षां जास्त आयात माल आला आहे. ह्मणजे इंग्लंडला पुष्कळ पैसे फ्रान्सला पाठवावयाचे आहेत. आतां इंग्लंडांतील निर्यात व्यापा-याच्या विनिमयपत्रांना जास्त मागणी होईल. यामुळे त्याचा भाव वाढेल. ह्मणजे लंडनमध्यें एका पौंडाला कायदेशीर भावापेक्षां कमी फ्रँक्स मिळतील अर्थात् हुंडणावळीचा भाव उतरेल, त्याप्रमाणेंच जर इंग्लंडहून जास्त माल निर्यात झालेला असेल तर विनिमयपत्रांचा पुरवठा मागणीपेक्षां जास्त होईल व यामुळे त्यांची किंमत उतरेल म्हणजे एका पौंडाला कायदेशीर भावापेक्षां जास्त फ्रँक्स मिळू लागतील. देशाच्या नाण्याच्या कायद्यानें ठरलेल्या भावापेक्षां परदेशाचें जास्त नाणें हुंडणावळीनें मिळू लागलें ह्यणजे त्या हुंडणावळीच्या दराला