पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/414

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[૪૦૦ ] अन्तार्व्यापाराप्रमाणें बहिर्व्यापारही हल्लींच्या काळीं पेशाच्या साधनानें चालतो. प्रथमतः दान देशांची चलनपद्धति एकच आहे अशी कल्पना करा. उदाहरणार्थ, इंग्लंड व ऑस्ट्रेलिया. समजा कीं, इंग्लंडांतील अ व्यापा-यानें ऑस्ट्रेलियांतील ब व्यापा-यास लोंकरी व सुती कापड पाठविलें आहे व ऑस्ट्रेलियांतील ब व्यापा-यानें लोंकर इंग्लंडच्या ड व्यापा-याकडे पाठविली आहे. आतां हें उघड आहे की, अ व्यापा-यास इंग्लंडमध्ये पैसे मिळावयाचे आहेत. क व्यापा-यास ऑस्ट्रेलियांत पैसे मिळावयाचे आहेत. इंग्लंडांतून ऑस्ट्रेलियांत पैोंड जाणें व त्याच वेळी ऑस्ट्रेलियांतून पैोंड इंग्लंडांत जाणें हें उघडच द्राविडीप्राणायामासारखे नुकसानीचें आहे. कारण या एकंदर चार व्यापा-यांमधली देवघेव इंग्लंडांत डनें अला पैसे दिल्यानें व ऑस्ट्रलियांत व व्यापा-यानें क व्यापा-यास रोख पैसे दिल्यानें सहज सुलभ रीतानें व प्रत्यक्ष पैशाचीं नेआण करण्यावांचून होणार आहे हें उघड आहे. व अशा स्थितींतच विनिमयपत्र आस्तित्वांत येतें. ही विनिमयपत्रे हुबधा देशांतील निर्यात व्यापारी परदेशांतील आयात व्यापा-यांवर काढतात. म्हणजे निर्यातव्यापारी, विनिमयपत्रांत लिहिलेल्या माणसाला पैसे देण्याबद्दल आयात व्यापा-यास हुकूम करतो. वरील काल्पनिक उदाहरणांत इंग्लंडांतील अ व्यापारी ऑस्ट्रेलियांतील ब व्यापा-यावर आपल्याला घ्यावयाच्या पैशाबद्दल विनिमयपत्र काढतो. आतां इंग्लंडांतील ड व्यापा-याला ऑस्ट्रेलियांत पैसे पाठवावयाचे आहे. तेव्हां रोख पैसे पाठवावयाच्या त्रासापेक्षा अर्चे बवर काढलेलें विनिमय पत्र विकत घेणें डला सोयीचें आहे. म्हणजे अनें काढलेलें विनिमयपत्र ड व्यापारी अला पैसे देऊन विकत घेतो व तें तो ऑस्ट्रेलियातील क व्यापा-याला पाठवितो व क व्यापारी तें पत्र ब व्यापा-याकडे पाठवून पैसे घेतो. तेव्हां या विनिमयपत्रानें एक पैसाही या देशांतून त्या देशांत न पाठवितां चार व्यापा-यांची देवघेव पुरी होते. अर्थात इंग्लंडांतील आयात व्यापारी निर्यात व्यापा-यास रोख पैसे देतो व ऑस्ट्रेलियांतील आयात व्यापारी ऑस्ट्रेलियांतील निर्यात व्यापा-यास रोख पैसे देतो. व इतक्या देवघेवी एका विनिमयपत्रांने होतात.यावरून विनिमयपत्रे ही अर्वाचीनकाळीं केवढें मोठे पैशाचें कार्य करतात हें सहज दिसून येईल. म्हणून हा व्यावहारिक कागदी चलनाचा प्रकार सर्वांत फार महत्वाचा आहे असेही दिसून येईल.