पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/408

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ३९४ ] पैदास अ देशांत जाईल. परंतु गव्हाच्या या पैदाशीनें गव्हाची किंमत कमी होऊं लागेल व म्हणून अ देशांतील मजूर शेतकी धंदा सोडून कापडाचा करूं लागतील. परंतु अ हा देश मोठा असल्यामुळे त्याला अजून गहूं उत्पन्न करणें प्राप्त आहे. तेव्हां आतां या व्यापाराचे सामान्य पारंणाम कसे झाले तें पहा. अ देशांतील किंमतीमध्यें फारसा फरक झाला नाहीं, व तेथील मजुरींतही फरक झाला नाहीं; पण ब देशामध्यें मजुरी कमी झाली व तो देश कापड मुळीच उत्पन्न न करतां सर्व गहूं-कारण त्यामध्यें त्या देशाची सापेक्ष सोय जास्त आहे-उत्पन्न करूं लागला व अ देश अजून दोन्ही पदार्थ उत्पन्न करतो. आतां किंमती व मजुरी यांची तुलना केली असतां देशांतील बहुजनसमाजावर या व्यापाराचा काय परिणाम झाला तो पहा. या व्यापारापासून अ देशांतील लोकांचा कांहीं फायदा किंवा तोटा झाला नाहीं. ब देशामध्यें ४ शिलिंगांऐवजीं मजुरी २ शिालंग ८ पेन्स झाली. व कापड ८ शिलिंगांवरून ४ शिलिंगांवर आलें व गहूं ६ शिलिंगांपासून ४ शिलिंगांवर आले.

   दुसरा प्रकार-आतां ब हा देश विस्तीर्ण आहे व अ लहान आहे अशी कल्पना करा. या स्थितींत बहिर्व्यापाराच्या योगानें अ देशांतील किंमती ब देशांतील किंमतीबरोबर होतील. म्हणजे कापड ४ शिलिंगांपासून ८ शिलिंगांवर जाईल व गहूं ४ पासून ६ शिलिंगांवर जाईल. यामुळे अ देशामध्यें मजुरी वाढेल व अ देश फक्त कापडच तयार करूं लागेल. आणि ब कापड व गहूं असे दोन्ही तयार करील. या प्रकारांत व देशांतील लोकांची स्थिति आहे तशीच राहील. अ देशांतील मजुरी वाढेल व मालाच्या किंमतीही वाढतील. परंतु मजुरीची वाढ मालाच्या किंमतीच्या वाढीपेक्षां जास्त होईल. 
   तिसरा प्रकार-आतां दोन्ही देश बहुतेक सारख्याच आकारांचे आहेत अशी कल्पना करा. या स्थितींत मालाच्या किमती दोन्ही किंमतीच्या सरासरीबरोबर होतील म्हणजे कापडाची किंमत दोन्ही देशांत दर वारास ६ शिलिंग होईल व गव्हाची दर बुशिलास ५ शिलिंग किंमत होइल. यामुळे आदेशास कापड करणेंच जास्त किफाईतशीर होईल व तेथें शिलिंगांच्या ऐवजी ६ शिलिंग मजुरी होईल. व देशांत कापडाचा धंदा फारच आंतबट्ट्याचा होईल. म्हणून तेथे गहूं उत्पन्न करणें किफाईतशीर