पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/405

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ३९३ ] वल व श्रम तीं एका देशांतून दुस-या देशांत जाऊं शकत नाहीत. तसेंच, नेआणीचा खर्च मुळीच नाहीं असें समजावयाचें. व दोन देशांमध्यें व्यापार चालू होण्यापूर्वीं दोन्ही देश दोन दोन वस्तू तयार करीत आहेत व या दोन देशांमध्यें पैशाची क्रमणशक्ति वेगवेगळाली आहे. हें गृहीत धरून प्रथमतः आपण एक काल्पनिक उदाहरण घेऊं. अशी कल्पना करा कीं, अ आणि ब हे दोन देश आहेत. व त्यांची चलनपद्धति इंग्रजी चलनपद्धति आहे. बहिर्व्यापार सुरू होण्यापूर्वी दोन्ही देशांतील मजुरीचा सामान्य दर एकच आहे व तो दररोज ४ शिलिंग या मानाचा आहे. दोन्ही देश गहूं व कापड उत्पन्न करतात अशी कल्पना करा व अ देशामध्यें जमिनीच्या सुपीकतेमुळे व श्रमाच्या कार्यक्षमतेमळ एका दिवसाच्या श्रमानें १ वार कापड अगर एक बुशेल गहूं होती व ब देशांत एक वार कापडाला दोन दिवसाचे श्रम लागतात एक बुशल गहूं करण्यास दीड दिवसाचे श्रम लागतात. या स्थितीमध्यें बहिर्व्यापार सुरू होण्यापूर्वी अ देशामध्यें एक वारास ४ शिलिंग ही कापडाची किंमत असली पाहिजे व एका बुशेलास ४ शिलिंग अशी गव्हाची किंमत असली पाहिजे व ब देशांत कापडाची किंमत दर वारास ८ शिलिंग व गव्हाची किंमत दर बुशेलास १६शिलिंग असली पाहिजे; म्हणजे त्या त्या देशांतील किंमती त्या त्या देशांतील उत्पादनव्ययाच्या मर्यादेनें ठरलेल्या असल्या पाहिजेत. आतां या दोन देशांमध्यें अंतर्राष्ट्रीय व्यापार सुरू झाला तर काय परिणाम होईल? अ व ब या देशाच्या आकाराप्रमाणें या परिणामाचे निरानराळे तीन प्रकार होतील.

   पहिला प्रकार-समजा कीं, अ हा देश ब पेक्षां फारच विस्तीर्ण आहे व या दोन देशमांध्यें व्यापार सुरू झाला. आतां एकाच बाजारांत एका गुणाच्या मालाच्या किंमती एकच असावयाच्या या नियमानुसार किंमती एकच झाल्या पाहिजेत. परंतु त्यायोगें ब देशांतील किंमती अ देशाच्या किंमती जवळजवळ आल्या पाहिजेत. कारण अ हा देश फार मोठा असल्यामुळें त्याचें वजन बाजारावर जास्त पडणार. आतां ब देशामध्यें कापडाची किंमत निमी झाल्यामुळे मजुरांची मजुरीही निमी झाली पाहिजे. व गव्हाची किंमतही अ देशाइतकीच होईल. परंतु त्यांतील मजुरी कापडांतील धंद्याइतकी उतरणार नाहीं. व म्हणून ब देशांत कापड व्हावयाचें अगदी बंद होऊन सर्व मजूर गहूं तयार करूं लागतील व ही गव्हाची जास्त