पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/400

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[३८८]

ती त्याच सर्कलमध्यें चालते; परंतु नुकत्याच सरकारनें पांच रुपयांच्या नोटा सर्वगामी केल्या आहेत व त्या आतां सर्व 'हिंदुस्थानामध्यें चालतात. लवकरच दहा आणि पन्नास रुपयांच्या नोटा सर्वगामी व्हावयाच्या आहेत. सन १९०५ सालाअखेर सुमारें साडेपंचेचाळीस कोटींच्या नोटा हिंदुस्थानांत चालू होत्या.
                ---------------------------------------------
                          भाग चवदावा.
                      ---------------------------
                   बहिव्यापार व त्याची मीमांसा.
                --------------------------------------------
 येथपर्यंत आक्रमण केलेल्या मार्गाचें सिंहावलोकन केल्यास असें दिसून येईल कीं, विनिमयाचे बहुतेक प्रश्न आतां संपले आहत. मथळ्यांत लिहिलेला मात्र एक प्रश्न राहिला आहे व त्याचा एका स्वतंत्र भागांत विचार करणें योग्य आहे. कारण हा प्रश्न ऐतिहासिक व शास्त्रीय अशा दोनही दृष्टींनीं महत्वाचा आहे. मनुष्य मृगयावृत्तीत असतांना आपआपल्या गरजा स्वतःच्या श्रमानें भागवितो. यामुळे या काळांत विनिमय अगर अदलाबदल -याच शास्त्रीय पारिभाषिक शब्दाबद्द्ल सामान्य व्यवहारांत व्यापार हा शब्द वापरला जातो- आस्तित्वांतच येत नाहीं. परंतु समाजांत श्रमविभाग सुरू होऊन एक मनुष्य एकच माल तयार करूं लागला म्हणजे अदलाबदलीची अवश्यकता उत्पन्न होते. व प्रथमतः ही अदलाबदल ऐनजिनसी असते. परंतु या विनिमयामध्यें पुष्कळ अडचणी व गैरसोई असल्यामुळे ‘पैसा' म्हणून विनिमय सामान्य अगर विनिमयाचें साधन उत्पन्न होतें. यालाच निष्कव्यवहार म्हणतात व याच्या पुढची पायरी म्हणजे पतीच्या व्यवहाराची. याप्रमाणें अदलाबदलीच्या साधनाच्या तीन , पायऱ्या होतात:-ऐनजिनसी व्यवहार, निष्कव्यवहार व विश्वासव्यवहार. या तीन पाय-यांनुरूप अदलाबदलीचीं तीन रूपे अगर पायऱ्या होतात. प्रथमतः विनिमय अगर अदलाबदल अगर व्यापार हा खेड्यामधील व्यक्तीव्यक्तीमध्यें सुरू होतो. अर्थात त्याचे क्षेत्र संकुचित