पान:Arth shastrachi multatve cropped.pdf/387

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ३७५] या ब्यांकेपासून हॉलंडमधला नाण्याचा सर्व गोंधळ नाहींसा झाला व नाण्यांच्या गोंधळामुळे हॉलंड देशाच्या व्यापारास जो धक्का बसत असे तो नाहींसा होऊन हॉलंडची व्यापारांत फार भरभराट झाली. देशांतील सर्व शिल्लक पैसा या पेढीवर येऊं लागला. यामुळे देशांतील व्यापा-यांस भांडवलाची कधींच पंचाईत पडत नसे. अशा त-हेनें या पेढीनें हॉलंडांत व्यापारवृद्ध केली. पुढें सरकारानें या पेढीपासून अतोनात कर्ज घेतलें व शिल्लक रक्कम लढाईकरितां घेतली. यामुळे या ब्यांकेस वाईट स्थिति आली. इंग्लंडमध्यें पेढ्यांची उत्पत्ति निराळ्या कारणांनीं झाली. पूर्वी इंग्लंडांत मुख्य व्यापारी परकीय असत; परंतु पुढें देशी व्यापारी पुढे येऊं लागले. पूर्वीच्या काळीं. लोक आपला पैसाअडका व सोन्यारुप्याची शिल्लक सुरक्षितपणाकरितां लंडन येथील सरकारी तिजोरींत ठेवीत; परंतु १६४० मध्यें चार्लस राजानें लोकांचे पैसे बळजबरीनें तिजोरीतून काढून आपल्या कामास लावले.यामुळे प्रजेचा राजावरील विश्वास उडाला व तेव्हांपासून लोक आपले पैसे व शिल्लक लंडनमधल्या कोटांत न ठेवतां खासगी सोनाराजवळ ठेवू लागल. हे सोनार सराफांचा व्यापार करीत. यामुळ संरक्षणाकरितां त्यांच्याजवळ शिल्लक ठेवणें लोकांस जास्त सुरक्षित वाटू लागले. पहिल्या प्रथम या ठेवी ठेवण्याबद्दल या सराफांस कांहीं तरी शेकडावळ द्यावी लागे. परंतु या सराफांस असें दिसून आलें कीं, सर्व लोक एकदम आपली शिल्लक कधीही परत मागत नाहींत. साधारण एकंदर ठेवीच्या एकतृतीयांश रोखपैसा जवळ ठेवल्यास नेहमीं होणा-या देवघेवी पार पडतात. तेव्हां बाकीचा राहिलेला पैसा ते व्याजानें व्यापाऱ्यास देऊ लागले. या तऱ्हेनें व्यापा-यांस भांडवल सहज मिळू लागलें व व्यापारास तेजी आली. सराफांस हा व्यापार फारच फायदेशीर होता. तेव्हां ठेवीवाल्यांना उत्तेजन देण्याकरितां ते ठेवीबद्दल कांहीं एक शैकडावळ न मागतां उलट ठेवीवर थोडें थोडे व्याज देऊं लागले. या पद्धतीनें तर त्यांचेजवळ फारच ठेवी येऊं लागल्या. लोकांसही शिल्लक टाकण्याची व घरांत पैसा न ठेवण्याची बुद्धि होऊं लागली. कारण पूर्वी ठेवी सुरक्षित ठेवण्याकरितां उलट पैसा द्यावा लागे त्याचेऐवजीं ठेव ठेवणें ही एक लहानशी उत्पन्नाची बाबच झाली. शिवाय प्रसंग पडल्यास आपणास सर्व ठेव परत घेण्याचा अधिकार असेच. यामुळे ही शिल्लक टाकण्याची व ठेवी ठेवण्याची पद्धति अगदीं सार्वत्रिक होऊन